आर्थिक

Saving Account : बचत खात्यात किती पैसे ठेवू शकता? जाणून घ्या महत्वाचा नियम !

Saving Account : आजच्या प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत. बचत खात्यामुळे आर्थिक व्यवहार करणे खूप सुलभ होते. तसेच डिजिटल बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार अगदी क्षणार्धात होतात. तुम्ही बचत खाते आणि चालू खाते उघडू शकता. प्रत्येक खात्याचे वेगवेगळे फायदे आहेत. अशा परिस्थितीत, एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे आपण आपल्या बचत खात्यात किती रोख ठेवू शकतो?

लोक आपली बचत ठेवण्यासाठी या खात्याचा वापर करतात. अशातच या खात्यात किती पैसे जमा करता येतील असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तर तुमच्या माहितीसाठी या खात्यात रोख ठेवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही यात ठेवू शकता. पण यावेळी एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे या खात्यात तेवढीच रोकड ठेवावी जी ITR च्या कक्षेत येते. जर तुम्ही जास्त रोकड ठेवली तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागतो.

तुमच्या बचत खात्यात तुम्हाला किती व्याज मिळते याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागेल. यासोबतच तुम्ही खात्यात किती पैसे ठेवता. तुमच्या बचत खात्यातील ठेवींमधून तुम्हाला मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नात जोडले जाते.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि त्याला 10,000 रुपये व्याज मिळत असेल, तर त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न 10,10,000 रुपये मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख ठेवले तर तुम्हाला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल. तुम्ही असे न केल्यास आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts