आर्थिक

देशातील ‘या’ दोन मोठ्या बँकांनी मुदत ठेवी संदर्भात घेतला मोठा निर्णय! या बँकांमध्ये कराल एफडी तर मिळेल सर्वात जास्त व्याज

गुंतवणुकीमध्ये बँकांच्या मुदत ठेव योजनांना सर्वाधिक पसंती दिली जाते. कारण केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील व मिळणारा परतावा चांगला मिळेल या दृष्टिकोनातून बँकांच्या मुदत ठेव योजना खूप फायद्याच्या ठरतात. तसेच बँकांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक आकर्षक ऑफर मुदत ठेव योजनेसंदर्भात दिल्या जातात.

अगदी याच पद्धतीने जर आपण मुदत ठेव योजना संदर्भात असलेल्या ऑफरचा विचार केला तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेने देखील अशाच ऑफर गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या होत्या व या आकर्षक अशा ऑफरची मुदत ही मार्चमध्ये संपणार होती.

रंतु आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँक यांनी या ऑफरची मुदत वाढ केलेली आहे. त्यामुळे या बँकांच्या योजनांमध्ये आता ग्राहकांना मुदत ठेव करता येणार आहे व आकर्षक व्याजदराचा लाभ मिळवता येणार आहे.

 स्टेट बँक ऑफ इंडियाची स्पेशल एफडी ऑफर

एसबीआयच्या माध्यमातून एसबीआय वी केअर स्पेशल एफडी योजना सुरू करण्यात आलेली होती व या योजनेची मुदत मार्च अखेर संपणार होती. परंतु आता स्टेट बँकेने या योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली असून गुंतवणूकदारांना  आता या विशेष योजनेचा लाभ घेता येणार आहे

स्टेट बँकेच्या या विशेष एफडीच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना पाच ते दहा वर्षाच्या कालावधी करिता केलेल्या एफडीवर 7.5% व्याज मिळते. तसेच एसबीआयच्या या योजनेची ऑफर नवीन ठेवी आणि एफडी नूतनीकरणावर देखील लागू आहे.

याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजनेची मुदत देखील 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. बँकेची ही ऑफर 400 दिवसांच्या एफडीवर लागू असून या ऑफर अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.1% व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दराने व्याज दिले जाते.

 आयडीबीआय बँकेची उत्सव एफडी

तसेच एसबीआय सोबतच आयडीबीआय बँकेने देखील आपल्या विशेष एफडी ऑफर उत्सव एफडीची अंतिम मुदत 30 जून 2024 पर्यंत वाढवली असून जी 31 मार्च 2024 ला संपणार होती. आयडीबीआय बँकेच्या एफडी ऑफर 300 दिवस, 375 आणि 444 दिवसांच्या ठेवींसाठी देण्यात येते.

यामध्ये तीनशे दिवसांच्या उत्सव एफडी ऑफरच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना 7.05% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55% व्याज मिळते. त्यासोबतच 375 दिवसांची उत्सव एफडी केली तर सामान्य ग्राहकांना 7.1% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6% व्याज मिळते. 444 दिवसांच्या एफडी साठी सर्वसामान्य ग्राहकांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज सध्या मिळत आहे.

त्यामुळे दोन्ही बँकांनी त्यांच्या विशेष एफडी योजनांच्या अंतिम मुदतीत वाढ केल्यामुळे आता जास्तीत जास्त ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts