Fixed Deposit : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपली विशेष FD सुरू केली आहे. SBI च्या या नवीन योजनेचे नाव आहे ‘अमृत वृष्टि’ असे आहे. ही एक उच्च व्याजदर योजना आहे. बँकेने ही नवीन योजना 15 जुलै 2024 पासून लागू केली आहे. या योजनेवर बँक किती व्याज देत आहे पाहूया…
अमृत वृष्टी योजना 444 दिवसांच्या ठेवींवर 7.25 टक्के वार्षिक व्याजदर देत आहे. याशिवाय SBI ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज देखील देईल. या योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज मिळत आहे. ही विशेष एफडी बँक शाखा, इंटरनेट बँकिंग आणि YONO चॅनलद्वारे खरेदी केली जाऊ शकते. या FD मध्ये तुम्ही जास्तीत जास्त 3 कोटी रुपये गुंतवू शकता.
गुंतवणूक कालावधी
कालावधी – 15 जुलै 2024 ते 31 मार्च 2025.
SBI अमृत वृष्टी साठी ठेव कालावधी
444 दिवस
व्याज
विशेष व्याजात, व्याज मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक जमा केले जाते. टीडीएस कापल्यानंतर बँक ग्राहकाच्या खात्यात व्याज जमा करते.
SBI अमृत वृष्टी साठी मुदतीपूर्वी पैसे कसे काढायचे?
5 लाख रुपयांपर्यंतची FD मुदतपूर्व काढण्यासाठी 0.50 टक्के शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, 5 लाख ते 3 कोटी रुपयांच्या एफडीवर 1 टक्के शुल्क भरावे लागते.
SBI अमृत कलश
यापूर्वी बँकेकडे अमृत कलश नावाचे आणखी एक उत्पादन होते. बँक 400 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज देत आहे.