SBI Banking News : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था. ही भारतातील एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँकेपैकी एक आहे. सर्व सरकारी बँकांमध्ये SBI सर्वाधिक मोठी बँक आहे. दरम्यान, जर तुमचेही एसबीआय मध्ये अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच फायद्याची ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील या सर्वाधिक मोठ्या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांच्या हितासाठी नुकतीच एक भन्नाट सुविधा सुरू केली आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता व्हाट्सअप बँकिंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेच्या माध्यमातून आता ग्राहकांना घरबसल्या आपल्या व्हाट्सअपवरून विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. एसबीआयच्या ग्राहकांना आता व्हाट्सअप वरूनच त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासता येणार आहे.
एवढेच नाही तर त्यांना मिनी स्टेटमेंट, अकाउंट स्टेटमेंट, पेन्शन स्लिप, कर्जाची माहिती, एनआरआय सेवा यासह बँकिंग संबंधित अन्य विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. बँक ग्राहकांना या सर्व सुविधा व्हाट्सअप वर मिळणार असल्याने त्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
छोट्या-मोठ्या बँकिंग कामासाठी आता ग्राहकांना बँकेत जाण्याचे काम राहणार नाही. दरम्यान आता आपण एसबीआयची व्हाट्सअप बँकिंगची सुविधा कशी काम करणार हे आपण थोडक्यात पाहणार आहोत.
एसबीआय ची व्हाट्सअप बँकिंग सुविधा
एसबीआयने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी व्हाट्सअपवर अनेक बँकिंग सुविधा सुरू केल्या आहेत. यासाठी ग्राहकांना +919022690226 हा मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये सेव करायचा आहे. यानंतर तुम्हाला या नंबर वर व्हॉट्सॲपवरून Hii असा मॅसेज पाठवायचा आहे.
जर तुम्ही एसबीआयच्या व्हाट्सअप बँकिंग साठी आधीच रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून एक मेसेज पाठवण्यास सांगितले जाईल.
तो मेसेज सेंड केल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाली की मग तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकता. याशिवाय तुम्ही इतरही अन्य बँकिंग सुविधेचा येथून लाभ घेऊ शकणार आहात. यामुळे एसबीआयच्या ग्राहकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.