SBI FD Scheme : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांनां आकर्षित करण्यासाठी काही विशेष FD योजना चालवत आहे. अमृत कलश देखील बँकेची अशीच एक महत्वाची एफडी योजना आहे. जर तुम्हीही एससबीआय मध्ये एफडी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही अमृत कलश एफ डी योजना फायदेशीर ठरणार आहे.
कारण की बँकेच्या इतर सामान्य एफडी योजनांच्या तुलनेत यातून ग्राहकांना अधिकचा परतावा मिळत आहे. दरम्यान, आज आपण एसबीआयच्या याच स्पेशल एफ डी योजनेची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे एसबीआयची स्पेशल एफ डी स्कीम?
एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध स्पेशल एफडी स्कीम ऑफर करते. अमृत कलश एफडी स्कीम ही अशीच एक स्कीम आहे. ही स्पेशल एफ डी स्कीम 400 दिवसांची आहे.
या स्पेशल स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.10% या इंटरेस्ट रेट ने व्याज दिले जाते. तसेच, सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.60% म्हणजेच सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% अधिकचे इंटरेस्ट रेट मिळते. मात्र ही एक विशेष FD स्कीम आहे.
ही योजना लिमिटेड टाईम पिरियडसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. यामुळे जर तुम्हालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर सप्टेंबरच्या आधीच तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार आहे.
5 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
बँकेच्या एफडी कॅल्क्युलेटर नुसार, जर सामान्य ग्राहकांनी या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर म्हणजेच चारशे दिवसांनी पाच लाख 40 हजार 88 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच 40,088 रुपये व्याज मिळणार आहे. तसेच जर सीनियर सिटीजन ग्राहकांनी या योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना पाच लाख 43 हजार दोन रुपये मिळणार आहेत. अर्थातच सीनियर सिटीजन ग्राहकांना 43 हजार दोन रुपये एवढे व्याज मिळणार आहे.
सामान्य ग्राहकांच्या तुलनेत सीनियर सिटीजन ग्राहकांना या एफ डी योजनेतून अधिकचा परतावा मिळत आहे.यामुळे आत्तापर्यंत हजारो लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे.
विशेष म्हणजे आणखी काही महिने या योजनेत गुंतवणूक करता येणार असल्याने गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढणार आहे. या योजनेची लोकप्रियता पाहता या योजनेत गुंतवणूक करण्याची मुदत बँकेने दोनदा वाढवली आहे.