SBI HDFC And ICICI Bank FD Rates : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे धोरण एफडी करणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. आरबीआयने फेब्रुवारी 2023 पासून म्हणजे जवळपास दीड वर्षांपासून रेपो रेट मध्ये बदल केलेला नाही. रेपो रेट तेव्हापासून जवळपास स्थिर आहेत. जर रेपो रेट कमी झाले तर विविध कर्जांचे व्याजदर कमी होत असतात.
यामुळे एफ डी व्याजदर देखील कमी होत असतात. तसेच जर यामध्ये वाढ झाली तर विविध कर्जांचे व्याजदर वाढतात आणि एफडीचे व्याजदर देखील वाढतात. मात्र गेल्या दीड वर्षांपासून आरबीआयने रेपो रेट मध्ये कोणताच बदल केलेला नसल्याने विविध बँकांच्या माध्यमातून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला जोरदार परतावा दिला जात आहे.
यामुळे अलीकडे महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात एफडी करत आहे. एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला आता प्राधान्य दाखवले जात आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांच्या काळात देशातील अनेक बँकांनी आपले एफडी चे व्याजदर सुधारित केले आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसबीआय, एचडीएफसी आयसीआयसीआय या बँकांसमवेतच पीएनबी, युनियन, बँक ऑफ इंडिया या बँकांनी आपल्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. दरम्यान ८ ऑगस्टला आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीचा निकाल समोर येणार आहे.
हा निकाल जाहीर होण्यापूर्वी देशातील विविध बँकांनी एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. अशा परिस्थितीत आज आपण एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या देशातील तीन बड्या बँकांचे एफ डी व्याजदर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया : SBI सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 3.50% ते 7.00% या इंटरेस्ट रेटने व्याज ऑफर करत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडीवर चार टक्क्यांपासून ते 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
म्हणजे सीनियर सिटीजन ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% अधिक चे व्याज मिळते. एसबीआयने जाहीर केलेले हे दर १५ जूनपासून लागू आहेत.
एचडीएफसी बँक : HDFC देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या मुदतीच्या कालावधीसाठी FD ऑफर करते. या एफडीसाठी बँकेच्या माध्यमातून 3% ते 7.4% दराने व्याज ऑफर केले जात आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.90% या दराने व्याज दिले जात आहे. बँकेकडून ४ वर्षे आणि सात महिने ते ५५ महिने कालावधीच्या ठेवींसाठी सर्वाधिक व्याज ऑफर केले जात आहे.
ICICI बँक : आयसीआयसीआय ही देशातील दुसरी सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. ही बँक सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडी साठी आपल्या सामान्य ग्राहकांना 3% ते 7.20% दराने व्याज ऑफर करत आहे. सिनिअर सिटीजन ग्राहकांना मात्र सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिक चे व्याज दिले जाते.