SBI Home Loan News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. काही लोकांचे हे स्वप्न कधीच पूर्ण झाले असेल तर काही लोक आजही या स्वप्नांसाठी झगडत असतील. मात्र घराचे स्वप्न पूर्ण करणे ही काही सोपी बाब नाही.
यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्च करावी लागते. अनेकदा घर घेण्यासाठी बँकेकडून होम लोन सुद्धा घेतले जाते. आधी कर्ज काढणे वाईट समजले जात असे.
कर्ज काढून घराचे स्वप्न
भारतीय संस्कृतीत कर्ज घेणे वाईट असल्याचे म्हटले जात. मात्र काळानुरूप यामध्ये बदल झाला आहे. अनेक जण आता कर्ज काढून घराचे स्वप्न पूर्ण करत आहे.
जाणकार लोक देखील कर्ज काढून घर घेणे काहीअंशी फायदेशीर असल्याचे सांगतात. कारण की भविष्यातही घरांच्या किमती वाढतच राहणार आहेत.
25 लाखांचे कर्ज घेतल्यास किती हप्ता ?
अशा परिस्थितीत जर तुम्हीही घर घेण्यासाठी कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. विशेषता ज्यांना एसबीआय कडून होम लोन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची ठरेल.
कारण की आज आपण एसबीआय बँकेच्या होम लोन ची माहिती पाहणार आहोत. एसबीआय कडून 25 वर्ष कालावधीसाठी 25 लाखांचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार हे आज आपण पाहणार आहोत.
एसबीआय बँकेचे होम लोन साठीचे व्याजदर
एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ई बँक आपल्या ग्राहकांना 8.50% ते 9.65% या इंटरेस्ट रेटने गृहकर्ज ऑफर करत आहे.
एसबीआय बँकेकडून टॉप अप होम लोन देखील उपलब्ध करून दिले जात आहे. SBI कडून टॉप अप होम लोन 8.80% ते 11.30% या इंटरेस्ट रेट ने दिले जाते.
25 लाखाचे लोन घेतले तर
एसबीआय कडून जर पंचवीस वर्षे कालावधीसाठी 25 लाखांचे लोन 8.50% या इंटरेस्ट रेटने मंजूर झाले तर कर्जदाराला वीस हजार 131 रुपये एवढा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
अर्थातच या कालावधीत कर्जदाराला 60 लाख 39 हजार तीनशे रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच या कालावधीत कर्जदाराला 35 लाख 39 हजार 300 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.