SBI Home Loan News : अन्न, वस्त्र अन निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेत असतो. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर अगदीच तारेवरची कसरत करावी लागते. संपूर्ण आयुष्यभर जमवलेला पैसा लावूनही अनेकांना घर खरेदी करण्यासाठी गृह कर्ज काढावे लागते.
तुम्हालाही नवीन घर खरेदी करण्यासाठी होम लोन घ्यायचे आहे का ? अहो, मग बँकेची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरंतर, देशातील जवळपास सर्वच प्रमुख बँकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज दिले जात आहे.
पण बहुतांशी बँका गृह कर्जासाठी ग्राहकांकडून अधिकचे प्रक्रिया शुल्क वसूल करतात. पण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय मान्सून ऑफर अंतर्गत, गृहकर्ज घेणाऱ्यांना प्रक्रिया शुल्कावर 100% पर्यंत सूट ऑफर करत आहे.
एसबीआयने ‘एक्स’वर ही माहिती दिली आहे. प्रोसेसिंग फीवर 100% पर्यंत सूट देऊन तुमचे ड्रीम होम अनलॉक करा, असे SBI ने पोस्टमध्ये म्हटले आहे. पण ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहे.
यामुळे जर तुम्हाला याचा लाभ त्याचाघ्यायचा असेल तर लवकरच गृह कर्जासाठी अर्ज करावा लागणार आहे. येत्या काही दिवसात घरासाठी जे लोक गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी राहणार आहे.
या संधीचा फायदा घेऊन तुम्ही गृहकर्जावर मोठी बचत करू शकता. साधारणपणे SBI गृहकर्जाच्या रकमेवर 0.35% प्रक्रिया शुल्क आणि GST आकारते. गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क किमान रु 2,000/- अधिक GST आणि कमाल रु 10,000/- आहे.
ही ऑफर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध राहणार आहे. यानंतर ही ऑफर कालबाह्य होईल. म्हणजे जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.
प्रोसेसिंग फी काय असते
गृहकर्जावर बँका एकरकमी शुल्क आकारतात. ही फी होम लोन प्रोसेसिंग फी म्हणून ओळखली जाते. ही सर्वसाधारणपणे कर्जाच्या रकमेतून वजा केली जात नाही. कर्जदाराला ती स्वतंत्रपणे बँकेला द्यावी लागते. ही कर्ज प्रक्रिया खर्च भरण्यासाठी बँकेद्वारे आकारले जाणारे शुल्क आहे.
काही बँका ठराविक वेळी गृहकर्जासाठी प्रक्रिया शुल्क माफ करतात. दरम्यान, एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना मान्सून धमाका ऑफर अंतर्गत याच प्रोसेसिंग फी मधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत.