SBI Home Loan:- प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःचे घर असावे ही तीव्र इच्छा असते व प्रत्येक जण आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न करत असतो. घरबांधणी किंवा घर विकत घेणे ही खूप खर्चिक बाब असल्यामुळे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच जण बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या होम लोनचा आधार घेतात. अनेक बँकांच्या माध्यमातून होम लोन दिले जाते व प्रत्येक बँकांकडून दिल्या जाणाऱ्या होम लोनचे व्याजदर आणि इतर वैशिष्ट्ये वेगवेगळे असतात.
जर आपण देशातील अग्रगण्य असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विचार केला तर या बँकेकडून दिले जाणारे होम लोन देखील फायदेशीर असून कमीत कमी व्याजदर तसेच प्रक्रिया शुल्क, महिलांसाठी विशेष ऑफर व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फायदे इत्यादी एसबीआय कडून ऑफर केले जातात.
एसबीआय नियमित गृह कर्ज घर खरेदी, बांधकाम सुरू असलेली मालमत्ता, घराचे बांधकाम तसेच घराची दुरुस्ती व नूतनीकरण अशा विविध कारणांकरिता गृह कर्ज देते. स्टेट बँकेकडून दिले जाणारे गृह कर्जाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या त्या प्रकारानुसार व्याजदर व इतर गोष्टी या बदलत असतात. त्यामुळे या लेखात आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या होम लोनची माहिती घेणार आहोत.
एसबीआय होम लोनचे प्रकार
1- एसबीआय फ्लेक्सिपे होमलोन– स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून होम लोनचा हा पर्याय पगारदार कर्जदारांसाठी उपलब्ध असून जास्त कर्जाच्या रकमेकरिता पात्रता प्रदान करण्यासाठी हा प्रकार फायद्याचा आहे. या प्रकारामध्ये पूर्व ईएमआय कालावधी दरम्यान फक्त व्याज भरण्याचा पर्याय मिळतो व त्यानंतर मध्यम ईएमआय भरता येतो.
तुम्ही भरलेले ईएमआय पुढील वर्षांमध्ये वाढवले जातात. या प्रकारचे कर्ज हे तरुण कमावत्या व्यक्तींसाठी योग्य आहे. या प्रकारचे होम लोन पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना मिळते तसेच अर्जदाराचे क्रेडिट प्रोफाइल नुसार त्याला कर्जाची रक्कम मंजूर होते.
जर आपण याचा व्याजदर पाहिला तर तो एका केसपासून दुसऱ्या केसमध्ये बदलतो. या प्रकारच्या होम लोनच्या कर्जाचा कालावधी 30 वर्षापर्यंत असतो. जर आपण प्रक्रिया शुल्क पाहिले तर एकूण कर्ज रकमेच्या 0.35%( कमीत कमी 2000 तर कमाल दहा हजार रुपयांपर्यंत असते. याकरिता वयोमर्यादा 21 ते 45 वर्ष( कर्जासाठी अर्ज करण्याकरिता) तर 70 वर्षे (कर्ज परतफेडीसाठी) आवश्यक आहे.
2- एसबीआय प्रिव्हिलेज होमलोन अर्थात विशेषधिकार गृहकर्ज– या प्रकारचे होम लोन हे केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी ज्यात PSBs, केंद्र सरकारचे PSU आणि पेन्शन पात्र सेवा असलेल्या इतर व्यक्तींचा यामध्ये समावेश होतो. अर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइल नुसार कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.
त्यामध्ये देखील व्याजदर हा एका केसपासून दुसऱ्या केसमध्ये बदलतो. त्याच्या होम लोनचा कर्जाचा कालावधी हा 30 वर्षापर्यंत असतो व याला कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क लागत नाही. या प्रकारच्या होम लोनसाठी अर्ज करण्याकरिता अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल 75 वर्ष असणे गरजेचे आहे.
3- एसबीआय शौर्य होमलोन– या प्रकारचे होम लोन हे खास करून लष्कर भारतीय संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येते. एसबीआय शौर्य होम लोन हे आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया शुल्क, शून्य प्री पेमेंट दंड, महिला कर्जदारांसाठी विशेष सवलत आणि बरेच काही फायदे यामध्ये मिळतात.
कर्मचाऱ्यांना या प्रकारचे होम लोन मिळते व कर्जाची रक्कम ही अर्जदाराच्या क्रेडिट हिस्ट्रीनुसार मंजूर होते. यामध्ये देखील व्याजदर एका केसपासून दुसऱ्या केसमध्ये बदलतो. कर्जाचा कालावधी हा 30 वर्षापर्यंत असतो. कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क यामध्ये लागत नाही. या प्रकारच्या होम लोन करिता अर्जदाराचे वय हे किमान 18 ते कमाल 75 वर्षाच्या दरम्यान असावे.
4- एसबीआय रिअल्टी होमलोन– ज्या ग्राहकांना घर बांधायचे आहे व त्याकरिता प्लॉट घ्यायचा आहे असे ग्राहक या कर्जाचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये मात्र जेव्हा तुमचे कर्ज मंजूर होते तेव्हापासून पाच वर्षाचा आत घराचे बांधकाम सुरू होईल याची खात्री करणे आवश्यक असते. या प्रकारचे कर्ज हे पगारदार आणि पगार नसलेल्या व्यक्तींना मिळते.
कर्जाची रक्कम ही अर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइल नुसार मंजूर केली जाते. या प्रकारच्या होम लोनचे व्याजदर पाहिले तर रुपये तीस लाखापर्यंत 8.90%, तीस लाख ते 75 लाख रुपयापर्यंत नऊ टक्के आणि 75 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर 9.10% इतका व्याजदर लागतो. कर्जाचा कालावधी हा दहा वर्षापर्यंत असतो. या प्रकारच्या कर्जाचे प्रोसेसिंग शुल्क हे कर्ज रकमेच्या 0.35% म्हणजेच किमान 2000 ते कमाल दहा हजार रुपये पर्यंत लागते. या प्रकारच्या होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे किमान 18 ते कमाल 65 वर्ष असावे.
5- एसबीआय होम टॉप अप कर्ज– ज्या कर्जदारांना जास्त पैशांची आवश्यकता असते व ते या प्रकारचे होम लोनसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही भारतीय रहिवासी असलेला पगारदार व पगार नसलेल्या व्यक्तीला या प्रकारचे होम लोन मिळते. कर्जाची रक्कम ही अर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइल नुसार मंजूर होते.
या प्रकारच्या होम लोनमध्ये व्याजदर हा रुपये वीस लाख पर्यंत 8.60%, वीस लाख ते पाच कोटीपर्यंत 8.80 टक्के ते 9.45% आणि कर्ज रक्कम पाच कोटी रुपये असेल तर व्याजदर हा 10.65% इतका लागतो. या प्रकारच्या होम लोनचा कालावधी हा 30 वर्षापर्यंत आहे. या प्रकारच्या होम लोनकरिता प्रोसेसिंग अर्थात प्रक्रिया शुल्क हे कर्ज रक्कमेच्या 0.35% म्हणजेच किमान 2000 ते कमाल दहा हजार रुपये पर्यंत लागते. अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल 70 वर्षापर्यंत असावे.
6- एसबीआय गर्ल होम–टॉप कर्ज– हा एक महत्त्वाचा होम लोनचा प्रकार असून एसबीआय इन्स्टा होम टॉप कर्ज पूर्व निवडलेल्या ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून मिळते. काही प्रकारच्या व्यक्तिगत सहभागाशिवाय हे कर्ज मंजूर केले जाते. या प्रकारचे होम लोन पगारदार आणि पगार नसलेल्या व्यक्तीला देखील मिळते व कर्जाची रक्कम एक लाख ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान असते.
या प्रकारच्या होम लोनवर 9.30% व्याजदर आकारला जातो. याकरिता क्रेडिट स्कोर साडेसातशे किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. या कर्जाचा कालावधी हा पाच वर्षाच्या गृह कर्जाची किमान अवशिष्ट मुदत इतका असतो. याकरिता रुपये 2000 अधिक जीएसटी इतके प्रक्रिया शुल्क लागते. याकरिता अर्जदाराचे वय हे किमान 18 ते कमाल 70 वर्ष असणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे व इतर अनेक प्रकारे होम लोन देण्यात येते.