SBI Interest Rates : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या करोडो ग्राहकांना नवीन वर्षाच्या आधीच भेट दिली आहे. SBI ने तब्बल 10 महिन्यांनंतर मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने शेवटच्या वेळी फेब्रुवारी 2023 मध्ये एफडीवरील व्याजदर सुधारित केले होते. SBI ने FD वरील व्याज 0.50 टक्क्यांनी वाढवले असून, ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर मिळणार आहे.
SBI च्या वेबसाईटनुसार, FD व्याजदरातील वाढ आज 27 डिसेंबर 2023 पासून लागू झाली आहे. बँकेने 2 कोटींवरील एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
बँकेने 7 दिवस ते 45 दिवसांदरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वरील व्याजदर 3 टक्क्यांवरून 3.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, जो 50 बेस पॉइंट्सने वाढला आहे. SBI ने कर्जावरील व्याजदर 46 दिवसांवरून 179 दिवसांपर्यंत 4.50 टक्क्यांवरून 4.75 टक्के म्हणजे 25 बेस पॉइंट्सपर्यंत वाढवला आहे. बँकेने FD वरील व्याजदर 180 दिवसांवरून 210 दिवसांपर्यंत 25 bps ने वाढवला आहे.
वाढीव व्याजदर
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वरील व्याजदर 5.75 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आला आहे. तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 6.50 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे FD वरील नवीन व्याजदर
7 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४ टक्के
46 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.२५ टक्के
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के.
(SBI WeCare FD अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या FD वर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळते.)