आर्थिक

SBI Bank : SBI देत आहे बक्कळ कमाई करण्याची संधी, ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

SBI Bank : जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि दुप्पट परताव्याची योजना शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल, आज आम्ही तुम्हाला SBI बँकेची अशी एक योजना सांगणार आहोत, जी तुमचे पैसे काही काळातच दुप्पट करते.

तुम्ही दुप्पट नफा देणाऱ्या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची ही खास योजना तुमच्यासाठी चांगली राहील. या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील आणि तुमची कमाईही चांगली होईल. या योजनेत पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. तरी यात गुंतवणूक करण्यासाठी आता तुमच्याकडे खूप वेळ शिल्लक राहिला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या विशेष योजनेचे नाव ‘SBI अमृत कलश स्पेशल एफडी’ आहे, या योजनेची अंतिम तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली आहे आणि यावेळी ही अंतिम तारीख 31 मार्च 2024 रोजी संपत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या विशेष एफडीमध्ये लोकांना सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत उत्सवादरम्यान ही एफडी लॉन्च करण्यात आली होती. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनाही या एफडीमध्ये अतिरिक्त व्याज मिळते.

गुंतवणूक किती दिवसांसाठी करावी लागेल?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश एफडी योजनेत किमान 400 दिवस गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याज मिळते, तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त म्हणजेच 7.60 टक्के व्याज मिळते. हा व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमित एफडीवरील व्याजापेक्षा जास्त आहे.

मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले तर?

तुम्ही तुमची FD 400 दिवसांपूर्वी खंडित केल्यास, ठेवीच्या वेळी लागू होणारा व्याजदर कमी होईल. ही वजावट 0.50 टक्के ते 1 टक्क्यांपर्यंत असू शकते. अमृत ​​कलश स्पेशल एफडीवरील व्याजाचे पेमेंट मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक आधारावर केले जाते आणि ते तुमच्या खात्यात जमा केले जाते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts