SBI Bank : गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) विशेष FD स्कीम ‘अमृत कलश’ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हातात खूप कमी वेळ शिल्लक आहे. SBI बँकेच्या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता तुमच्याकडे फक्त 31 मार्च 2024 पर्यंतचा वेळ आहे.
SBI ‘अमृत कलश’ योजनेची खास गोष्ट म्हणजे ती FD वर 400 दिवसांसाठी 7.6 टक्के दराने व्याज देते. या योजनेत ग्राहकांना कमी वेळेत जास्त व्याज मिळत आहे. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगली कमाई करायची असेल तर संधी तुमच्यासाठी चांगली आहे.
SBI च्या म्हणण्यानुसार, बँकेच्या अमृत कलश स्पेशल FD स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याजदर मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर दिला जाईल. सामान्य नागरिकांपेक्षा जेष्ठ नागरिकांना येथे जास्त फायदा होत आहे.
या योजनेतील गुंतवणूकीची तारीख 31 मार्च 2023 पर्यंत आहे. या कालावधीत कोणीही ही योजना ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुक करू शकते. अमृत कलश याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना बँक कर्ज सुविधा देखील प्रदान करते. तुम्ही अमृत कलश योजनेअंतर्गत कर्जासाठी देखील अर्ज करू शकता.
बँकेच्या वेबसाइटनुसार, कोणीही अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह गुंतवणूक करू शकतो आणि हमी परतावा मिळवू शकतो. SBI बँकेच्या मते, अमृत कलश एफडी गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याज पेमेंट घेऊ शकतात.
SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर, TDS कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकाच्या खात्यात जोडले जातात. SBI वेबसाइटनुसार, अमृत कलश FD मध्ये जमा केलेले पैसे 400 दिवसांच्या कालावधीपूर्वी काढले गेल्यास, बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा 0.50 टक्के ते 1 टक्के व्याजदर वजा करू शकते.