आर्थिक

SBI Loan: एसबीआयकडून कर्ज घ्या आणि घरावर सोलर पॅनल बसवा! सरकारकडून देखील मिळेल अनुदान

सौर ऊर्जेचा वापर काळाची गरज असून त्याचे महत्त्व आता प्रत्येकाला कळायला लागल्यामुळे आता हळूहळू सौर ऊर्जा वापराकडे कल वाढताना दिसून येत असून  या सगळ्या गोष्टींना केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला जात आहे.

सरकारच्या दृष्टिकोनातून बघितले तर सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 ला जेव्हा अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन केले तेव्हा लगेचच पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केलेली होती.

या योजनेच्या माध्यमातून त्यांचे युनिट मोफत विजेचा लाभ दिला जाणार आहे व या माध्यमातून देशभरातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देखील मिळणार आहे. पीएम सूर्योदय योजनेच्या अंतर्गत जर एक किलोवॉट सोलर पॅनल बसवले तर तीस हजार रुपये, दोन किलो वॉटचे सोलर पॅनलसाठी 60000 तर 3 किलो वॅटच्या सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजाराचे अनुदान मिळणार आहे.

परंतु याकरिता अर्जदाराने सोलर पॅनल बसवणे गरजेचे आहे. जर आपण सोलर पॅनल बसवण्याचा खर्च पाहिला तर हा लाखात येतो व त्यामुळे प्रत्येकालाच ते शक्य होत नाही.

परंतु यामध्ये देखील आता चिंता करण्याची गरज नसून तुम्हाला जर सोलर पॅनल बसवायचे असेल तर तुम्ही आता एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाची देखील मदत घेऊ शकणार आहात. सोलर पॅनल बसवण्यासाठी ही बँक तुम्हाला कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करू शकणार आहे.

 स्टेट बँक ऑफ इंडिया किती देणार कर्ज?

याबाबत मिळालेली माहिती बघितली तर सौर पॅनल बसवण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही कर्ज देणार असून या कर्ज योजनेअंतर्गत बँकेच्या माध्यमातून तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे व तीन किलोवॅट पेक्षा जास्त आणि दहा किलोवॅट पर्यंतच्या क्षमतेकरिता सहा लाख रुपये पर्यंत कर्ज त्याच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

जर आपण या कर्जाचे व्याजदर पाहिले तर दोन किलोवॅट पर्यंतचे सोलर बसवण्यासाठी मिळणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सात टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.

तर तीन किलोवॅट पेक्षा जास्त आणि दहा किलोवॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणाऱ्या सहा लाख रुपये कर्जावर वार्षिक 10.15 टक्के व्याज दराने हे कर्ज मिळते. विशेष म्हणजे बँकेकडून या कर्जावर कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

 काय आहेत या कर्जासाठी महत्त्वाच्या अटी?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या तीन किलोवॅट क्षमतेपर्यंत सोलर पॅनल कर्जाकरिता अर्जदाराला कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाचे निकष लावण्यात आलेले नाहीत.

परंतु जर तीन किलोवॅट पेक्षा जास्त आणि दहा किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या कर्जासाठी उत्पन्नाची अट लावण्यात आलेली असून ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांनाच या प्रकारचे कर्ज मिळू शकणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts