आर्थिक

SBI New Card : ग्राहकांसाठी SBI लॉन्च केले नवीन कार्ड, होणार ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

SBI New Card : स्टेट बॅंक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सगळ्यात मोठ्या बॅंकापैकी एक बॅंक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना ऑफर करत असते. यापैकी एक उत्तम योजना म्हणजे SBI WeCare एफडी योजना होय. यात आता गुंतवणूक करण्यास अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले असून तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत यात गुंतवणूक करू शकता.

अशातच आता बँकेकडून RuPay सक्षम नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड लाँच करण्यात आले आहे. ज्यामुळे देशभरातील रस्त्यांपासून रेल्वे आणि जलमार्ग ते पार्किंगपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी देयके सुलभ होणार आहेत. इतकंच नाही तर या कार्डचा वापर रिटेल आउटलेटवर खरेदीसाठी करता येईल.

याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी माहिती दिली आहे. बोलताना ते म्हणाले की, ‘रुपे आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) तंत्रज्ञानाद्वारे समर्थित नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड, मोबिलिटी अनुभवात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे. ते वन नेशन वन कार्डच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत आहे’. दरम्यान हे कार्ड ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 मध्ये लॉन्च केले आहे.

भारतातील सर्वात मोठ्या कर्जदात्याकडून असे सांगण्यात आले आहे की ते MMRC मेट्रो लाइन 3 आणि आग्रा मेट्रोमध्ये NCMC आधारित तिकीट समाधान लागू करणार आहे, जे लवकरच लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच SBI ही देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की या बँकेच्या गृहकर्ज पोर्टफोलिओने 6.53 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे. जून 2023 पर्यंत, या बँकेचा ठेवी आधार ₹45.31 लाख कोटींपेक्षा जास्त आहे, ज्याचे CASA प्रमाण 42.88 टक्के इतके आहे. तर 33 लाख कोटी रुपयांहून जास्त प्रगती आहे. गृह कर्ज आणि वाहन कर्जामध्ये SBI चा बाजारातील वाटा अनुक्रमे 33.4% आणि 19.5% इतका आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts