SBI Personal Loan : आपल्यापैकी अनेकांना जेव्हा अचानक पैशांची गरज भासते तेव्हा आपण बँकेत जातो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतले जाते. जर तुम्हीही आगामी काळात वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.
विशेषतां एसबीआयकडून या प्रकारातील कर्ज घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय आपल्या ग्राहकांना किफायतशीर व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देत आहे.
सदर बँकेकडून आपल्या ग्राहकांना पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. पण, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जाच्या तुलनेत अधिक असतात.
दरम्यान आज आपण एसबीआय बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर कसे आहेत ? तसेच जर एसबीआयकडून पाच वर्ष कालावधीसाठी 10 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर किती रुपये व्याज म्हणून भरावे लागतील या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
एसबीआय बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर खालील प्रमाणे
एसबीआय सॅलरी अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना 11.35% ते 11.85% या इंटरेस्ट रेटने वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. जे लोक डिफेन्स / सेंट्रल आर्म पोलीस किंवा इंडियन कोस्ट गार्ड मध्ये असतील अशा लोकांना 11.35% ते 12.85% या इंटरेस्ट रेटने वैयक्तिक कर्ज दिले जात आहे.
सरकारी कर्मचारी असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून 11.50% ते 14 टक्के या इंटरेस्ट रेटने वैयक्तिक कर्ज दिले जात आहे. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून 12.50% ते 14.50% या इंटरेस्ट रेट ने वैयक्तिक कर्ज दिले जात आहे.
5 वर्षांसाठी 10 लाखांचे कर्ज घेतले तर
जर तुमचे एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असेल आणि तुम्हाला पाच वर्ष कालावधीसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज 11.35% रेटने मंजूर झाले तर तुम्हाला 21 हजार 917 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच तुम्हाला पाच वर्ष कालावधीसाठी तीन लाख पंधरा हजार 43 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. अर्थातच मुद्दल आणि व्याज असे एकूण 13 लाख 15 हजार 43 रुपये एवढी रक्कम तुम्हाला बँकेला द्यावी लागणार आहे.
मात्र ग्राहकांनी येथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे यामध्ये प्रोसेसिंग चार्ज याचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजेच ग्राहकांना प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागणार आहे.