SBI RD Account : स्टेट बँकेत खाती असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI बँक गुंतवणुकीसाठी ग्राहकांना एक विशेष ऑफर देत आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत तुमचेही खाते असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. SBI च्या या स्कीममध्ये तुम्हाला सुमारे 55,000 रुपये व्याज मिळेल. SBI च्या या स्कीममध्ये तुम्हाला एकही पैसा एकाच वेळी जमा करण्याची गरज नाही. तुम्ही जर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करू शकता.
जर तुम्ही SBI मध्ये RD केली तर सामान्य ग्राहकांना 6.50 टक्के ते 7 टक्के पर्यंत व्याज मिळेल. जरी तुम्ही तुमची छोटी बचत दर महिन्याला जमा केली तरी तुम्ही त्यातून मोठा फंड तयार करू शकता.
SBI RD
एसबीआय एक वर्ष ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी आरडी देते. यामध्ये तुम्ही दरमहा किमान 100 रुपये जमा करू शकता. SBI चे RD सामान्य लोकांसाठी 6.5% ते 7% व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7% ते 7.5% व्याज देत आहे. हे दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू आहेत.
SBI RD व्याजदर
-1 वर्ष ते 2 वर्षापेक्षा कमी व्याज सामान्यांसाठी 6.80% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30% आहे.
-2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी 7% (सर्वसाधारण) 7.50% (ज्येष्ठ नागरिक)
-3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी 6.50 (सर्वसाधारण) 7.00 (ज्येष्ठ नागरिक)
-5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत 6.50 (सर्वसाधारण) 7.50 (ज्येष्ठ नागरिक)
आरडी म्हणजेच आवर्ती ठेव योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये दरमहा तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही आरडीमध्ये 5 वर्षांसाठी दरमहा 5,000 रुपये जमा केले तर तुम्हाला 6.50% दराने व्याज मिळेल. त्यानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर अंदाजे 54,957 रुपये व्याज मिळेल.
तुमची 5 वर्षांत दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुमच्याकडे 3 लाख रुपये जमा होतील, परंतु मॅच्युरिटीवर तुम्हाला सुमारे 3,54,957 लाख रुपये मिळतील. यापैकी 3 लाख रुपये तुमची गुंतवणूक असेल आणि व्याजाची रक्कम सुमारे 54,957 रुपये असेल.