आर्थिक

SBI च्या 5 वर्षांच्या आरडी स्कीममध्ये जर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळणार ?

SBI RD Scheme : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेच्या खातेधारकांची संख्या करोडोंच्या घरात आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अल्प व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.

बँकेकडून गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सर्वसामान्यांना परवडेल अशा व्याजदरात बँकेकडून हे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. यासोबतच बँक फिक्स डिपॉझिट आणि आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांनाही चांगले व्याज देते.

जर तुम्ही ही नजीकच्या काळात एसबीआय मध्ये आरडी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआय बँकेच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे एसबीआय बँकेची पाच वर्षांची आरडी स्कीम?

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, बँक आपल्या ग्राहकांना आरडी योजनेतील गुंतवणुकीसाठी किमान 6.5% आणि कमाल सात टक्के या दराने व्याज ऑफर करत आहे. जर तुम्ही पाच वर्षे कालावधीच्या आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला बँकेकडून 6.5% या इंटरेस्ट रेट ने व्याज दिले जाणार आहे.

अशा परिस्थितीत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एसबीआयच्या आरडी स्कीम मध्ये पाच वर्ष कालावधीसाठी तीन हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर किती रिटर्न मिळणार याचे गणित आता आपण समजून घेणार आहोत.

3 हजाराची गुंतवणूक केल्यास मिळणार इतके रिटर्न

एसबीआयच्या पाच वर्षाच्या आरडी स्कीम मध्ये जर एखाद्याने प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर अर्थातच पाच वर्षांनी दोन लाख 12 हजार 972 मिळणार आहेत.

यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवलेली रक्कम आणि व्याज याचा समावेश असेल. यात एक लाख 80 हजार रुपये ही गुंतवणूकदाराची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे आणि उर्वरित पैसे म्हणजेच 32,972 रुपये हे या इन्व्हेस्टमेंट वरील व्याज राहणार आहे.

नक्कीच ज्या गुंतवणूकदारांना दरमहा छोटी रक्कम गुंतवून मोठा फंड तयार करायचा असेल त्यांच्यासाठी एसबीआय ची आरडी स्कीम फायदेशीर ठरणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे एसबीआय प्रमाणेच एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया यांसारख्या अनेक राष्ट्रीयकृत बँका आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहेत.

पोस्ट ऑफिस कडूनही आरडी स्कीम ऑफर केली जाते. पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही चांगला परतावा मिळतो.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts