SBI Special FD Scheme : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. खरे तर अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आजही एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट करण्याला विशेष पसंती दाखवली जाते. विशेषतः एसबीआय सारख्या बँकांमध्ये एफडी करण्याला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे.
कारण की, एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी अनेक विशेष FD योजना राबवते. या विशेष एफडी स्कीम मधून ग्राहकांना चांगला परतावा सुद्धा मिळत आहे. एसबीआय बँकेची अशीच एक विशेष एफडी योजना आहे अमृत कलश योजना आणि वीकेअर योजना.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी या दोन्ही एफ डी योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या दोन्ही योजनांमध्ये आता गुंतवणूकदारांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही योजनांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
एसबीआय ववीकेअर स्पेशल एफडी योजना : SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेची WeCare स्पेशल FD इतर FD च्या तुलनेत जास्त व्याज देते. मात्र ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू आहे. इतर सामान्य ग्राहकांना या योजनेत पैसे गुंतवता येणार नाहीत.
या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 2 ते 3 वर्षांच्या कालावधीत अधिक व्याज मिळते. यामध्ये 5 ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या स्कीमध्ये व्याजदर स्थिर राहत नाहीत.
SBI ची अमृत कलश योजना : एसबीआयची ही आणखी एक विशेष FD योजना आहे. या एफडीचा कालावधी हा ४०० दिवसांचा आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला 7.10 टक्के व्याज मिळते. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजाची रक्कम मुदतपूर्तीनंतर मिळते.
म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर व्याजाचा पैसा मिळणार आहे. गुंतवणूकदाराने मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास, जमा केलेल्या रकमेवर व्याज दंड म्हणून 0.