SBI Fixed Deposit Schemes : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते. या योजनांअंतर्गत ग्राहकांना उत्तम परतावा देखील मिळतो, आज आपण अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत. ज्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळवू शकता.
आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश एफडी बद्दल बोलत आहोत. बँकेच्या या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची तरतूद आहे.
बँकेच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची देखीक गरज नाही. या योजनेत तुम्ही घरी बसून गुंतवणूक करू शकता. तुम्ही
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो बँकिंग ॲप वरून या योजनेत सहज गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुम्ही बँकेत जाऊनही गुंतवणूक करू शकता.
गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केली होती. यानंतर देशातील बँकांनी त्यांच्या एफडी योजनांचे व्याजदर वाढवले होते. मुदत ठेवी आकर्षक करण्यासाठी बँकांनी व्याजदरात वाढ केली होती आणि नवीन योजनाही सुरू केल्या होत्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी अनेक FD योजना ऑफर करते. सामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी SBI FD वर 3 टक्के ते 7.1 टक्के पर्यंत व्याज दिले जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या सर्व मुदत ठेवींवर 50 बेसिस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज मिळते. बँक 400 दिवसांच्या एफडी अमृत कलशवर सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक 7.1 टक्के व्याज देत आहे.
SBI FD दर
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 7 दिवसांपासून 45 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के दराने व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, FD वर 46 दिवस ते 179 दिवसांसाठी 4.5 टक्के, 180 दिवस ते 210 दिवसांसाठी 5.25 टक्के, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 5.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
त्याचप्रमाणे 400 दिवसांच्या FD स्कीम अमृत कलशवर जास्तीत जास्त 7.10 टक्के व्याज दिले जात आहे. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेल्या FD योजनांवर 7.00 टक्के व्याज दिले जात आहे, तर 3 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या मुदत ठेव योजनांवर 6.5 टक्के व्याज दिले जात आहे.
SBI FD खाते
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, बँक 400 दिवसांच्या विशेष मुदत ठेवींवर 7.10 टक्के दराने व्याज देईल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के दराने व्याज मिळणार आहे. ही योजना 15 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे.