SBI FD Scheme : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. सध्या बँक आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम एफडी योजना चालवत आहे. या एफडी योजनेत बँक 7.4 टक्के दराने व्याज देत आहे. हे व्याज पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफिस स्कीमसारख्या इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूप जास्त आहे.
याशिवाय या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कालावधी. तुम्ही या योजनेत फक्त 1 किंवा 2 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. बँक सामान्य लोकांना 2 वर्षाच्या FD वर 7.4 टक्के दराने व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्के दराने व्याज देत आहे.
SBI च्या या योजनेत तुम्ही 1 वर्षासाठी FD केली तर बँक सामान्य लोकांना 7.10 टक्के आणि वृद्धांना 7.60 टक्के दर देत आहे.या योजनेत गुंतवणूकदारांना किमान 15 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 2 कोटी रुपये गुंतवावे लागतात.
SBI ची ही योजना निवृत्तीच्या जवळ असलेल्यांसाठी योग्य आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे मिळाल्यावर ते या योजनेत सहज गुंतवणूक करू शकतील. जर गुंतवणुकराने या योजनेत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर त्याला मिळणारे व्याज 0.05 टक्क्यांनी कमी होईल. SBI च्या या योजनेत चक्रवाढ व्याजाच देखील लाभ मिळेल. याशिवाय बँक ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची सुविधा देखील देत आहे.
या FD योजनेत तुम्ही 2 कोटी ते 5 कोटी रुपयांची मोठ्या प्रमाणात ठेव ठेवल्यास वृद्धांना 1 वर्षात 7.77 टक्के आणि 2 वर्षांसाठी 7.61 टक्के व्याज मिळत आहे.
बँकेची ही नॉन-कॉलेबल स्कीम आहे. यामध्ये तुम्ही कार्यकाळापूर्वी पैसे काढू शकत नाही. तुम्ही कार्यकाळापूर्वी पैसे काढल्यास, तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. आतापर्यंत या योजनेत किती काळ गुंतवणूक करायची याबाबत बँकेच्या वेबसाइटवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.