Scheme For Startup:- सध्या सुशिक्षित बेरोजगारीची समस्या ही देशापुढील गंभीर समस्या असून नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार तरुण तरुणींच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता बरेच सुशिक्षित तरुण हे व्यवसायांच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतात.
परंतु व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे त्यासाठी देखील आपल्याला पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळे बरेच तरुण इच्छा असून देखील पैशांच्या अभावी व्यवसाय सुरू करू शकत नाही. अशा तरुणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवता यावे व त्यांना व्यवसाय उभारता यावा किंवा एखादा नवीन स्टार्टअप सुरू करता
यावा याकरिता काही योजनांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या प्रोत्साहन देण्यात येते. अशा योजनांच्या माध्यमातून तरुण स्वतःचा व्यवसाय व स्टार्टअप सुरू करू शकतात व आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात. नेमक्या कोणत्या सरकारच्या योजना आहेत की ज्याद्वारे तरुणांना आर्थिक दृष्ट्या व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जाते? त्याच योजनांची माहिती या लेखात घेऊ.
या योजना व्यवसाय उभारण्यासाठी तरुणांना करतील मदत
1- क्रेडिट गॅरंटी स्कीम अर्थात सीजीएसएस– क्रेडिट गॅरंटी स्कीमच्या माध्यमातून सरकार स्टार्टअप कंपन्यांना तब्बल दहा कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देते. या योजनेच्या माध्यमातून सरकार नॉन बँकिंग फायनान्स कंपनी व व्यापारी बँक इत्यादी कडून जे काही कर्ज देण्यात येते त्या कर्जावर गॅरंटी देते. ही गॅरंटी स्टार्टअप करिता दिली जाते एवढेच नाही तर या दहा कोटी रुपये कर्जावर हे हमी देखील दिली जाते. या योजनेअंतर्गत स्टार्ट अप कंपन्यांना कर्ज उपलब्ध होते.
2- प्रधानमंत्री मुद्रा योजना अर्थात पीएमएमवाय– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रेडिट गॅरंटी स्कीम योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून लघुउद्योगांना, स्टार्टअप ला देखील दहा लाखापर्यंत कर्ज मिळते. आरबीआय तसेच व्यापारी बँका, एमएफआय आणि एनबीएफसी द्वारे हे कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत श्रेणीनुसार 50 हजारापासून ते दहा लाखापर्यंत कर्ज मिळते.
3- स्टार्ट
अप इंडिया योजना– ग्रामीण भागातील महिला आणि एससी/ एसटी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे तारण न ठेवता दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेचे महत्त्व म्हणजे या अंतर्गत व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिले तीन वर्ष आयकर मधून देखील सुट दिली जाते.4- राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ योजना– तंत्रज्ञान तसेच फायनान्स व मार्केटिंग यांना आधार देण्यासाठी किंवा सपोर्ट करण्याकरिता ही योजना राबविण्यात येत असून विविध स्टार्टअप तसेच लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असून या अंतर्गत तुम्हाला दोन प्रकारची कर्ज सुविधा मिळते. यातील पहिली म्हणजे….
विपणन सहाय्य योजना– जर तुम्हाला बाजारातील स्थान भक्कम करायचे असेल व त्यात वाढ करायची असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत मिळणारी कर्जाची रक्कम वापरू शकतात. त्यामुळे तुमच्या व्यवसायाची जाहिरात देखील होते व मार्केटिंग वाढण्यास मदत होते.
क्रेडिट सहाय्य योजना– या अंतर्गत तुम्ही व्यवसायासाठी लागणारा कच्च्या मालाची खरेदी तसेच मार्केटिंग करिता आर्थिक मदत मिळवू शकतात.
अशा पद्धतीने तुम्ही या योजनांचा फायदा घेऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात.