आर्थिक

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी ! ‘या’ 7 बँका एफडीवर देत आहेत छप्पर फाड परतावा !

Senior Citizen : तुम्ही ज्येष्ठ नागरिक ग्राहकांच्या श्रेणीत येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. देशातील अनेक बँका सध्या जेष्ठ नागरिकांना एफडीवर चांगला परतावा देत आहेत, या बँका ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्यांच्या नियमित दरापेक्षा जास्त व्याज देत आहेत. यापैकी काही स्मॉल फायनान्स बँका (SFBs) त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% पर्यंत व्याज देत आहेत. 

एफडीवर उत्तम परतावा देणाऱ्या टॉप बँका !

1. युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 1001 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9.50% व्याज देते. सध्या कोणतीही बँक एवढा परतावा देत नाही. जर तुम्हाला तुमच्या एफडीवर उत्तम परतावा हवा असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे.

2. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देत आहे.

3. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देत आहे.

4. जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देत आहे.

5. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७५० दिवसांच्या एफडीवर ९.११% व्याज देत आहे.

6. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9% व्याज देत आहे.

7. ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 9% व्याज देत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts