आर्थिक

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी, ‘या’ 8 बँका FD वर देतायेत सर्वाधिक व्याज !

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिक अशा गुंतवणुकीचे पर्याय शोधतात जिथे जास्त व्याजासह पैसा सुरक्षित राहतील. अशास्थितीत जेष्ठ नागरिक एफडीकडे वळतात, एफडी ही देशातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, अशातच आज आपण देशातील अशा बँकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या एफडीवर उत्तम परतावा ऑफर करत आहेत.

नुकतेच फेडरल बँकेने ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त ८.४० टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. फेडरल बँकेशिवाय, अशा अनेक बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया…

1. येस बँक

खाजगी क्षेत्रातील बँक येस बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर जास्तीत जास्त ८.२५ टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही भरपूर परताव्याची गुंतवणूक शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

2. बंधन बँक

बंधन बँक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना 8.35 टक्के दराने व्याज देत आहे.

4. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९.६ टक्के व्याज देत आहे.

3. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना FD वर जास्तीत जास्त ८.७५ टक्के व्याजदर देत आहे.

5. जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ९.०० टक्के व्याज देत आहे.

6. ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याजदर देत आहे.

7. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना FD योजनेवर ८.६ टक्के व्याज देत आहे.

8. युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या एफडी योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना ९.५ टक्के व्याजदर देत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts