Senior Citizen Saving Scheme : सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर पहिले नाव समोर येते ते म्हणजे पोस्ट ऑफिस योजनांचे, याचे मुख्य कारण म्हणजे येथील पैशांची हमी केंद्र सरकार घेते. पोस्ट ऑफिस कडून अनेक उत्तम योजना राबवल्या जातात, ज्या अंतर्गत ग्राहकांना उत्तम परतावा मिळतो. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार जिथे जास्त परतावा मिळत आहे.
या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला ८.२ टक्के व्याज मिळत आहे. एवढेच नाही तर या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. ही योजना खास वृद्धांचे हित लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे तेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत किमान 1,000 गुंतवू शकता. या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही जास्तीत जास्त ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. तथापि, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी आणखी तीन वर्षांनी वाढवू शकता.
या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला आयकर सवलती देखील मिळतात. यामध्ये तुम्हाला आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा फायदा मिळतो. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत तुमचे खाते सहज उघडू शकता.