आर्थिक

Senior Citizen Savings Scheme : बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना देत आहे सार्वधिक परतावा, आजच करा गुंतवणूक !

Senior Citizen Savings Scheme : जेव्हा-जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीची चर्चा होते तेव्हा प्रथम नाव समोर येते ते म्हणजे मुदत ठेव, मुदत ठेवीतील तुमची गुंतवणूक सुरक्षित तसेच खात्रीशीर परतावा देणारी आहे. अशातच तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा ही अशा बँकांपैकी एक आहे जी ग्राहकांना एका वर्षाच्या एफडीवर सर्वोत्तम परतावा देत आहेत. बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना ३६५ दिवसांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज देत आहे. इतर बँकापेक्षा बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एफडीवर जास्त परतावा ऑफर करत आहे. बँकेचे एफडी दर पुढीलप्रमाणे –

बँक ऑफ बडोदाचे एफडी दर

-7 दिवस ते 14 दिवस – सर्वसामान्यांसाठी 3.00 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के

-15 दिवस ते 45 दिवस – सर्वसामान्यांसाठी 3.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 टक्के

-46 दिवस ते 90 दिवस – 5 टक्के सर्वसामान्यांसाठी, 5.50 टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी

-91 दिवस ते 180 दिवस – सर्वसामान्यांसाठी 5 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.50 टक्के

-181 दिवस ते 210 दिवस – सर्वसामान्यांसाठी 5.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 टक्के

-211 दिवस ते 270 दिवस – सर्वसामान्यांसाठी 6 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के

-271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षाखालील – सर्वसामान्यांसाठी 6.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75 टक्के

-1 वर्ष सर्वसामान्यांसाठी 6.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के

-1 वर्ष ते 400 दिवसांपेक्षा जास्त – सर्वसामान्यांसाठी 6.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के

-400 दिवसांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत – सर्वसामान्यांसाठी 6.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के

-2 वर्षांवरील आणि 3 वर्षांपर्यंत – सर्वसामान्यांसाठी 7.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के

-3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सर्वसामान्यांसाठी 6.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.00 टक्के

-5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – सर्वसामान्यांसाठी 6.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.00 टक्के

-10 वर्षांवरील (कोर्ट ऑर्डर योजना) – सर्वसामान्यांसाठी 6.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75 टक्के

-399 दिवस (बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट योजना) – सर्वसामान्यांसाठी 7.16 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.65 टक्के

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts