Senior Citizen : जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी महत्वाची आहे, आज आम्ही देशातल्या अशा बँका सांगणार आहोत, ज्या एफडीवर जबरदस्त परतावा देत आहेत. या बँका 7.75% पर्यंत व्याज देत आहेत. अशातच जेष्ठ नागरिकांना ही कमाई करण्याची ही उत्तम संधी आहे.
आम्ही बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक आणि खाजगी बँकाबद्दल बोलत आहोत. या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहेत.
या सर्व बँका ६० वर्षांवरील निवासी भारतीयांना सर्वाधिक व्याजदर देतात. यामध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ आणि 3 वर्षांच्या एफडीचा समावेश आहे.
व्याजाच्या तिमाही चक्रवाढीच्या आधारावर हे मूल्य मोजले जाते. काही सरकारी बँका अति ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षे आणि त्याहून अधिक) अधिक व्याजदर देतात.
ॲक्सिस बँक
Axis Bank ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर देते. म्हणजे आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.25 लाख रुपये होईल.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा बद्दल बोलायचे तर ते तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याज देते. हे ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर देते. म्हणजे आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.26 लाख रुपये होईल.
एचडीएफसी बँक
HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देतात. यासह, आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देते. म्हणजेच आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याजदर देतात.
कॅनरा बँक
कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज देते. या बँकेत आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.