आर्थिक

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांना ‘या’ बँका देत आहेत छप्पर फाड रिटर्न्स, बघा कोणत्या?

Senior Citizen : सुरक्षित गुंतवणुकीचे दुसरे नाव म्हणजे एफडी. भारतातील जवळ-जवळ सर्वच लोक येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एफडीवरील परतावा जरी कमी असला तरी देखील येथील गुंतवणूक जोखीममुक्त आहे. तसे पाहायला गेले तर मागील काही काळापासून एफडीवर मिळणार परतावा हा वाढत चालला आहे, जेव्हापासून आरबीआय रेपो दरात वाढ करत आहे, तेव्हापासून एफडीवरील व्याजदर देखील वाढत आहेत. अशातच याचा फायदा जेष्ठ नागरिकांना जास्त होत आहे, कारण बँका सामान्य नागरिकांपेक्षा जेष्ठ नागरिकांना जास्त परतावा ऑफर करतात.

दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा 4 बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8 टक्के व्याज देत आहेत. FD वर ८ टक्के परतावा मिळणे खूपच आकर्षक आहे. कोणत्या आहेत त्या 4 बँका चला पाहूया..

पंजाब आणि सिंध बँक

ही बँक सामान्य लोकांना ४४४ दिवसांच्या एफडीवर ७.४० टक्के परतावा देत आहे. तर बँक ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज देते. ही ऑफर 31 जानेवारी 2024 पर्यंतच घेता येईल.

CSB बँक

ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ‘आचार्य फिक्स्ड डिपॉजिट’ नावाची विशेष एफडी ऑफर करत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ४०१ दिवसांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज मिळू शकते. बँकेने 1 डिसेंबर रोजी व्याजदरात सुधारणा केली आहे.

इंडसइंड बँक

1 डिसेंबर रोजी या बँकेने एफडी दर देखील सुधारित केले. ही बँक ८ आणि ८.२५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 8.25 टक्के व्याज आणि 2 वर्षांपेक्षा जास्त ते 61 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8 टक्के व्याज उपलब्ध आहे.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक

ही बँक 400 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 8.10 टक्के व्याज देत आहे. याशिवाय 12 महिन्यांच्या एफडीवर 8 टक्के व्याज, 600 आणि 900 दिवसांच्या एफडीवर 7.90 टक्के व्याज दिले जात आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts