आर्थिक

Share Market News: कंडोम बनवणाऱ्या ‘या’ कंपनीचा शेअर्स तुमच्याकडे आहे का? गुंतवणूकदारांना दिला तब्बल 250% परतावा! खरेदीसाठी एकच गर्दी

Share Market News:- जर आपण मंगळवारचा शेअर बाजाराचा विचार केला तर मंगळवारी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक  गाठला होता. सेन्सेक्सने 69306.97 ची पातळी गाठली होती तर निफ्टीने देखील 20813.10 चा उच्चांक गाठला होता.

साधारणपणे सोमवारपासून शेअर बाजारामध्ये चांगल्या प्रकारे तेजी दिसून येत आहे. तसेच बुधवारी देखील सलग सातव्या दिवशी बाजारात विक्रमी तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने मोठी भरारी घेतल्याचे दिसून आले.

बुधवारी देखील सेन्सेक्स सत्रात 69744.62 अंकांच्या नव्या सर्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. या सगळ्या परिस्थितीत मुंबईसह महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या समभाग मूल्यांमध्ये तब्बल सहा लाख कोटींची भर पडली आहे.

याच तेजीच्या धामधुमीत क्यूपिड लिमिटेडच्या शेअरने 2023 मध्ये गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. जर आपण या कंपनीच्या शेअरचा विचार केला तर वार्षिक आधारावर हा शेअर तब्बल 250 टक्क्यांनी वधारला आहे.

मंगळवारच्या सत्रात या शेअरची किंमत वाढीसह खुली झाली होती व प्रति शेअर 914 अशा इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. जर आपण सोमवारचा विचार केला तर सोमवारी एनएसईवर याचा बंद भाव 863 रुपये होता. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी झालेली वाढ जवळपास सहा टक्के अधिक आहे. या शेअरचा वर्तमान लाईफ टाईम उच्चांक पाहिला तर तो 925 रुपये प्रति शेअर आहे.

 क्यूपिड शेअरची प्राइज हिस्ट्री कशी

आहे?

हा शेअर भारतीय शेअर बाजारातील जे काही मल्टी बॅगर शेअर्स आहेत त्यापैकी एक असून गेल्या महिन्यात हा फार्मा स्टॉक प्रतिशेअर सुमारे 748 वरून 914 पर्यंत पोहोचला आहे. या कालावधीमध्ये या शेअरने तब्बल 20 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये या फार्मा कंपनीचा स्टॉक 246 प्रति शेअर वरून 914 प्रति शेअरच्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीमध्ये तब्बल या शेअरने 175 टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना जवळपास 250 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.

 या कारणामुळे कंपनीची उत्पादन क्षमता वाढेल

क्यूपिड लिमिटेडने मुंबई जवळील औद्योगिक परिसरामध्ये एक जमीन खरेदी करण्याची घोषणा केली असून या जमीन खरेदी नंतर कंपनीची उत्पादन क्षमतेत वाढवण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर यामुळे जागतिक बाजारपेठेत या कंपनीची पोझिशन देखील वाढण्याची शक्यता आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts