आर्थिक

Share Market : चांगली कमाई करून देणारा शेअर! आजच करा खरेदी; तज्ज्ञांचा सल्ला

Share Market : शेअर बाजारामध्ये तुम्ही थेट गुंतवणूक करता म्हणजे तुम्हाला काही कंपन्यांचे शेअर खरेदी करता येतात. तुम्ही खरेदी केलेल्या कंपन्यांचे शेअर वर चढले तर तुम्हाला थेट याचा फायदा मिळतो. परंतु, अनेक वेळा या शेअरची किंमत कमी होऊन तुम्हाला काही दिवसांतच खूप मोठा तोटाही होऊ शकतो.

परंतु शेअर मार्केटमध्ये काही शेअर्स असे आहेत की ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना काही वर्षातच लाखो रुपयांची खरेदी करून दिली आहे. तुम्हीही त्यात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. सध्या मार्केटमध्ये एक असाच शेअर आहे जो 9% वाढला आहे.

हे लक्षात घ्या की महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​शेअर्स आज त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर आहेत. आज या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे 8 तज्ञांकडून या शेअर्सला खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कंपनीची उलाढाल

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीज महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडवर खूप आनंदी दिसत आहे. कारण बीक्यू प्राइमच्या अहवालातील ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की या कंपनीचे शेअर्स 650 रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकतील. इतकेच नाही तर कंपनीच्या दृष्टिकोनातून सर्वात चांगली आणि महत्त्वाची बाब म्हणजे विक्री FY2023 मध्ये 1812 कोटी रुपये इतकी आहे. तर FY21 मध्ये कंपनीची विक्री 695 कोटी रुपये इतकी होती.

त्यामुळे महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडच्या सीईओ यांना असा विश्वास आहे की कंपनी पुढील 5 वर्षांमध्ये ही उलाढाल 5X पटीने वाढेल. सीईओच्या मतानुसार, FY28 पर्यंत विक्री 10,000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

शेअर बाजारातील अशी आहे कंपनीची कामगिरी 

मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. तर त्याच वेळी, 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये आतापर्यंत 43 टक्क्यांपेक्षा जास्त फायदा मिळवला आहे.

या कंपनीचे शेअर्स आज त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर व्यवहार करत होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 8 तज्ञांकडून या स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देण्यात आले आहे. जर हा शेअर्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला चांगली कमाई करता येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts