Multibagger Stocks : जर आपण शेअर बाजारावर एक नजर टाकली तर असे अनेक शेअर आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहेत. अशातच अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर देखील गेल्या काही काळापासून खूप चांगला परतावा देत आहे.
रिलायन्स पॉवरचे शेअर्स सध्या रॉकेटच्या गतीने पुढे जात आहेत. रिलायन्स पॉवरचा शेअर गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढून 33.43 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे.
रिलायन्स पॉवरचे शेअर आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशीही वरच्या वळणावर आहेत. या वर्षी 13 मार्चपासून रिलायन्स पॉवरचे शेअर्स 64 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 2800 टक्क्यांकपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
गेल्या 4 वर्षांत या शेअरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयांवर होते. तर 4 एप्रिल 2024 रोजी शेअर्स 33.43 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्सने 2858 टक्केची मोठी उडी घेतलीआहे. जर एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी 1 लाख रुपयांना रिलायन्स पॉवर शेअर्स खरेदी केले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य 29.58 लाख रुपये झाले असते.
गेल्या वर्षभरातही चांगली वाढ झाली. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 210 टक्के वाढ झाली. 5 एप्रिल 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 10.79 रुपयांवर होते. तर 4 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 33.43 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये एकूण 79 टक्के वाढ पाहायला मिळाली.
गेल्या 6 महिन्यांवर नजर टाकली तर कंपनीचे शेअर्स 18.76 रुपयांवरून 33 रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या एका महिन्यात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 43 टक्के वाढ झाली आहे. अशातच जर तुम्ही रिलायन्सचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही वेळ चांगली आहे.
टीप : कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.