Sheli Palan Karj Yojana:- आताच्या परिस्थितीमध्ये शेळीपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर केला जात असून तो आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या अनुषंगाने शेतीच्या इतर जोडधंद्यांपेक्षा शेळीपालन व्यवसाय हा फायद्याचा समजला जातो.
या व्यवसायामध्ये आता मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार तरुण येऊ लागल्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आता हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. त्यामुळे अशा व्यवसायांना आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. यामध्ये विविध बँका तसेच नाबार्डच्या माध्यमातून शेळीपालनासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सुविधा आता उपलब्ध होते.
शेळीपालन व्यवसायासाठी शासनाच्या योजना
शेळीपालन व्यवसायाचा विकास व्हावा व या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत. शेळीपालन व्यवसायाकरिता बँकांकडून तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवता येणे शक्य आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीने किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये किंवा स्वरूपात हा व्यवसाय सुरू करायचा आहे
व तुम्हाला पैशांची किती गरज आहे यानुसार तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. एवढेच नाही तर तुम्हाला यासाठी बँकेकडून जे कर्ज मिळते त्याच्या व्याजावर देखील तुम्हाला शासनाकडून अनुदानाचा फायदा मिळवता येतो. याकरिता तुम्हाला नाबार्डच्या माध्यमातून देखील कर्ज सुविधा दिली जाते
व अनुदानाचा देखील लाभ मिळत असतो. नाबार्ड कडून शेळीपालना करिता अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील अर्थात बीपीएल प्रवर्गातील लोकांना तब्बल 50% अनुदान मिळत आहे व इतर प्रवर्गातील नागरिकांना 40 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
शेळीपालनात कशासाठी मिळते तुम्हाला कर्ज?
शेळीपालन व्यवसाय करण्याकरिता तुम्हाला शेळ्यांची खरेदी करण्याकरिता व शेळ्यांच्या आहारा करीता लागणारे खाद्य तसेच चारा, शेळ्यांसाठी आवश्यक निवारा बांधकाम यासाठी तुम्हाला बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळते. नाबार्डच्या योजनेअंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँक, व्यावसायिक बँक तसेच नागरी बँक आणि राज्य सहकारी बँकांच्या माध्यमातून शेळीपालनासाठी कर्ज मिळते. यामध्ये या व्यवसायाकरिता वेगवेगळ्या बँका त्यांच्या निकषानुसार बँक त्यांच्या नियमानुसार ठराविक रकमेची कर्ज देत असतात.
या कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
शेळीपालन व्यवसाय करिता कर्ज हवे असेल तर तुम्हाला अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो, सहा महिन्यांची बँकेचे स्टेटमेंट तसेच पत्त्याचा पुरावा देणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुमचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आणि बीपीएल कार्ड( असल्यास ), जात प्रवर्गाकरिता जातीचे प्रमाणपत्र, वय आदिवासी प्रमाणपत्र, शेळीपालन व्यवसायाचा प्रकल्प अहवाल अर्थात प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जमीन नोंदणी दस्तऐवज इत्यादी कागदपत्रे लागतात.
यासाठी कुठे करावा लागतो अर्ज?
शेळीपालन योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तुम्हाला तो तुमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन करणे गरजेचे असते. यामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित सविस्तरपणे भरणे गरजेचे असते.
अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने शेळीपालन व्यवसाय करिता कर्ज मिळवू शकतात.