आर्थिक

Latest Price Hike : 1 एप्रिलपासून झटका, महागल्या ‘या’ कंपनीच्या गाड्या, वाचा…

Latest Price Hike : 1 एप्रिलपासून किआ आणि होंडा सारख्या कारच्या किंमती वाढल्या आहेत. नवीन आर्थिक वर्षात काही कंपन्यांनी किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ कच्च्या मालाच्या किमतींत झालेली वाढ आणि सप्लाय चेनशी संबंधित समस्यांमुळे करण्यात आली असल्यासचे कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात Kia आणि Honda कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर किंमती सुमारे 1 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

आघाडीची कार उत्पादक कंपनी Kia Motors ने निवडक मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहे. वाढीव किमती १ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू होतील. Kia कारच्या किमती भारतीय बाजारपेठेत 7.99 लाख ते 65.95 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.

Kia च्या लाइनअपमध्ये Sonet, Seltos आणि Carens इत्यादींचा समावेश आहे. Kia कारच्या किमती जवळपास 3 टक्क्यांनी वाढू शकतात. Kia Seltos च्या अपडेटेड मॉडेलने एक लाखांहून अधिक बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे.

किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, सेल्टोसची किंमत 10.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 20.30 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. सेल्टोस एसयूव्हीमध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात 1.5-लीटर पेट्रोल, 1.5-लिटर डिझेल आणि 1.5-लीटर टर्बो पेट्रोल समाविष्ट आहे.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या एसयूव्हीमध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय ॲम्बियंट लाइटिंग, एलईडी साउंड मूड लाइटिंग, हेडअप डिस्प्ले आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

जपानी कार उत्पादक कंपनी होंडा मोटर्स भारतीय बाजारपेठेत चांगली विक्री करत आहे. पण आता या कंपनीनेही किमती वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, दर किती वाढणार याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. होंडा मोटर्स सध्या भारतीय बाजारात अमेझ, सिटी, सिटी हायब्रिड आणि एलिव्हेट या तीन मॉडेल्सची विक्री करते.

एप्रिलपासून या मॉडेल्सच्या किमती वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतीय बाजारपेठेत होंडा कारची किंमत 7.16 लाख ते 20.39 लाख रुपये दरम्यान आहे. याशिवाय मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि कार विक्रीच्या बाबतीत देशातील टॉप 4 मध्ये असलेल्या ह्युंदाई मोटर्स देखील लवकरच किमती वाढवण्याची घोषणा करणार आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts