Silver Price:- गेल्या कित्येक महिन्यांपासून जर आपण सोने आणि चांदी या मूल्यवान धातूंच्या किमती पाहिल्या तर त्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून गगनाला गवसणी घालत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सध्या परिस्थितीमध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये स्थिरता नसून कमी अधिक प्रमाणात त्यांच्यामध्ये वाढ आणि घट होत असल्याचे दिसून येत आहे.
या दोन्हीमध्ये जर आपण चांदीचा विचार केला तर सध्या चांदीच्या दरांमध्ये देखील प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत असून आतापर्यंत ज्या गुंतवणूकदारांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे असे गुंतवणूकदारांना डिसेंबर पर्यंत चांदीच्या माध्यमातून तेरा टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे.
जर आपण गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये चांदीचे दर पाहिले तर त्यामध्ये किलोमागे 2151 रुपयांची घट आली व चांदी ८८५१५ रुपये किलो राहिली. परंतु जर आपण केडिया अडवाईजरीचे संचालक अजय केडिया यांचे मत पाहिले तर त्यांच्या मतानुसार डिसेंबर महिन्यापर्यंत चांदी एक लाख रुपये किलो पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
चांदीचे दर डिसेंबर पर्यंत पोहोचू शकतात एक लाख रुपये प्रतिकिलो पर्यंत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये चांदीच्या दरात प्रति किलो 2151 रुपयांचे घट आली व चांदी ८८५१५ रुपये किलोपर्यंत राहिली. परंतु या पार्श्वभूमीवर अजय केडिया यांच्या मते जर पाहिले तर डिसेंबर पर्यंत चांदीचे दर एक लाख रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतात. 21 तारखेला म्हणजेच 21 जून रोजी चांदीचे दर 90 हजार 666 रुपये प्रति किलो होते.
या वर्षामध्ये चांदीच्या दरात किती झाली वाढ?
जर आपण इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात आयबीजेएची आकडेवारी पाहिली तर त्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला चांदी 20.6 टक्क्यांनी म्हणजेच 15091 रुपयांनी महाग झाली होती व 29 डिसेंबर 2023 रोजी चांदीचा दर 73 हजार 395 रुपये प्रतिकिलो इतका होता.
यावर्षीचा मे महिना पाहिला तर 29 मेला चांदीचे दर 94 हजार 198 रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर गेले होते. परंतु सध्याच्या कालावधीत त्यामध्ये सहा टक्क्यांची घट आली आहे व सध्या चांदीचे दर पाच हजार सहाशे तीन रुपये पर्यंत खाली आले आहेत.
कोणत्या किमतीपर्यंत घसरण झाली तर चांदी खरेदी करणे चांगले राहील?
केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांचे मत पाहिले तर ज्या गुंतवणूकदारांना चांदीमध्ये गुंतवणूक करायचे आहे ते आता काही प्रमाणामध्ये चांदीची खरेदी करू शकतात.
परंतु जेव्हा चांदीची किंमत प्रतिकिलो 86 हजार पाचशे रुपये प्रती किलोपर्यंत घसरेल तेव्हा देखील खरेदी करणे चांगले राहील असे मत त्यांनी मांडले आहे. गेल्या आठवड्यामध्ये चांदीच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे.परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये दर पुन्हा वाढू शकतात अशी शक्यता आहे.