आर्थिक

SIP Investment : फक्त 150 रुपयांची गुंतवणूक तुमच्या मुलाला बनवेल लखपती ! कसे? जाणून घ्या…

SIP Investment : मध्यमवर्गीय कुटुंबांना नेहमीच पैसे वाचवण्याची योजना करावी लागते, मग ते मुलाच्या शिक्षणासाठी असो की मुलाच्या लग्नासाठी. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पैशांची तरतूद करणं हा महत्त्वाचा विषय असतो, त्यासाठी गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत, तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे चांगला फंड तयार करू शकता. अगदी लहान रकमेची बचत करूनही तुम्ही मोठ्या रकमा जमा करू शकता. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? शक्य आहे, जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर, आज आम्ही तुम्हाला अशा एक गुंतवणुकीबद्दल सांगणार आहोत, जिथे अगदी कमी गुंतवणूक करून मोठा निधी तयार करू शकता.

जर तुमच्या मुलाचे वय 2024 मध्ये 3 वर्षे असेल, तर तो 18 वर्षांचा होईपर्यंत म्हणजेच 2042 पर्यंत तुम्हाला 22 लाख रुपयांचा मॅच्युरिटी फंड मिळू शकेल. यासाठी तुम्हाला SIP योजनेत गुंतवणूक करावी लागेल. याचा उपयोग तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणासाठी तसेच भविष्यातील मोठ्या कामांसाठी करू शकता.

SIP गुंतवणूक म्हणजे काय?

तुम्ही म्हणाल SIPम्हणजे काय? तर ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे. याद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. साधारणपणे शेअर बाजारात पैसे बुडण्याची भीती असते. जर तुम्हाला जोखमीपासून दूर राहायचे असेल आणि शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची नसेल, तर SIP गुंतवणूक तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. तज्ञांचा असा विश्वास आहे की SIP मधील दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला मोठा निधी गोळा करण्यात मदत करते. लक्षात घ्या SIP मध्ये ठराविक रक्कम ठराविक कालावधीत गुंतवावी लागते.

समजा, एका SIP प्लॅनमध्ये तुम्ही दररोज 150 रुपये गुंतवले. म्हणजे तुम्ही एका महिन्यात 4,500 आणि एका वर्षात 54,000 ची गुंतवणूक कराल. लक्षात ठेवा, तुम्हाला ही गुंतवणूक 15 वर्षांसाठी करावी लागेल म्हणजेच तुम्ही एकूण 8,10,000 रुपये SIP मध्ये गुंतवाल.

साधारणपणे, SIP मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक 12% वार्षिक परतावा देऊ शकते. समजा तुम्हालाही १२% परतावा मिळाला. या गणनेनुसार, तुम्हाला १५ वर्षांत 14,60,592 इतके व्याज मिळेल. ही कमाई फक्त व्याजातूनच होईल. त्याच वेळी, जेव्हा SIP मॅच्युअर होईल, तेव्हा तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम (8,10,000) आणि व्याजाची रक्कम (14,60,592) मिळून मिळेल. म्हणजे ही एकूण रक्कम 22,70,592 रुपये असेल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts