SIP Investment : अनेक लोक शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळतात कारण शेअर बाजारात पैसे बुडण्याची जोखीम मोठ्या प्रमाणात असते. पण तुम्हाला शेअर बाजारातील गुंतवणुकीचा फायदा घ्यायचा असेल आणि शेअर्समध्ये गुंतवणूक टाळायची असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडात पद्धतशीर गुंतवणूक करू शकता. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे.
ज्यांना शेअर बाजारातील चढ-उताराचा परिणाम न होता दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवायची आहे त्यांच्यासाठी SIP हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा केवळ कमाईचा पर्याय नाही तर तो तुमच्या भविष्यासाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत देखील बनू शकतो. तुमचे वय २५ वर्षे असल्यास तुम्ही तुमच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये ३००० प्रति महिना गुंतवणे सुरू केले तर भविष्यात तुम्ही मासिक लाख रुपयांच्या वरती कमाई करू शकता.
तुम्ही २५ वर्षाचे असताना यात गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक 35 वर्ष चालू ठेवली तर तुम्ही भविष्यात मोठा निधी गोळा करू शकता. वयाच्या 25 व्या वर्षी पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे दरमहा 3000 ची गुंतवणूक केल्याने तुमच्या पैशाला वाढण्याची पूर्ण संधी मिळते. तुमच्या गुंतवणुकीमध्ये चक्रवाढीचा फायदा होतो आणि तुमचे निवृत्तीचे वय जवळ आल्यावर तुम्हाला निश्चित उत्पन्नाचा स्रोत देखील मिळतो.
जर तुम्ही दरमहा 3000 ची गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर 35व्या वर्षी, पाच टक्के वार्षिक वाढीसह, ती 15,760 ची मासिक गुंतवणूक होईल. याचा अर्थ असा की तुमच्या गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षी तुम्ही SIP मध्ये 36000 ची गुंतवणूक करता तर 35 व्या वर्षी तुम्ही 1.89 लाख गुंतवणूक करता.
12% सरासरी परताव्याच्या आधारावर विचार केला तर 35 वर्षात तुम्ही 32.51 लाख रुपये गुंतवले आहेत आणि तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 2.99 कोटी रुपये झाली आहे. तुम्ही 35 वर्षात सुमारे तीन कोटी रुपयांचे मालक झाला व्हाल. जर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्ती निधीमध्ये 3 कोटी रुपये ठेवले, तर दर वर्षी 6% च्या फिक्स डिपॉझिट दरानेही तुम्हाला दरमहा 1.5 लाख रुपये मिळतील.