आर्थिक

Sovereign Gold Bond : अशी संधी पुन्हा नाही! स्वस्तात खरेदी करता येईल सोने, मिळेल अतिरिक्त सवलत

Sovereign Gold Bond : समजा तुम्ही सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे. तुम्हाला आता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोने खरेदी करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारापेक्षा कमी दराने सोने खरेदी करता येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुद्ध सोने खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक सोनेरी ऑफर आणली आहे. ज्या गुंतवणूकदारांना सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करायची असेल, त्यांच्यासाठी सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या हा बाँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वतीने जारी करण्यात येतो. या योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे सोने खरेदी करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोल्ड बॉण्ड्स जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत. तुम्हाला यावर हमी परतावा मिळतो.

अतिरिक्त सवलत

किमतीचा विचार केला तर पाच दिवसांसाठी उघडणाऱ्या सोन्याच्या रोख्यांची इश्यू किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. ऑनलाइन अर्ज करणार्‍या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणार्‍या गुंतवणूकदारांना चिन्हांकित किमतीवरून 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलत मिळेल. गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 5,873 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे.

गुंतवणूक करण्याची पद्धत

  • तुम्हाला बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येईल.
  • तसेच तुम्हाला पोस्ट ऑफिसमधूनही खरेदी करता येईल.
  • स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करता येईल.
  • इतकेच नाही तर तुम्ही BSE आणि NSE प्लॅटफॉर्मवरून गोल्ड बाँड्स खरेदी करू शकता.

किती करता येईल खरेदी?

  • तुम्ही कमीत कमी 1 ग्रॅमच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करता येते.
  • गुंतवणुक कमाल मर्यादा 4 किलो इतकी आहे.
  • वैयक्तिक, HUF साठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा 4 किलो इतकी आहे.
  • ट्रस्टसाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा 20 किलो इतकी आहे.

लक्षात ठेवा हे महत्त्वाचे मुद्दे

सार्वभौम गोल्ड बाँडची किंमत:

आरबीआयने सार्वभौम गोल्ड बाँडची इश्यू किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे.

सवलत:

RBI ने या महिन्यात सार्वभौम गोल्ड बाँडच्या सिरीज -2 साठी ऑनलाइन अर्जदारांसाठी 50 रुपये प्रति 1 ग्रॅम सवलत दिली आहे.

बाँड तारीख:

RBI च्या सार्वभौम सुवर्ण बाँड 2023 चा दुसरा भाग कालपासून म्हणजेच 11 सप्टेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत खुला असणार आहे.

असा करा अर्ज :

ही योजना 2023-24 मालिका 2 बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज – NSE आणि BSE द्वारे विकण्यात येणार आहे.

जाणून घ्या पात्रता:

ही योजना निवासी व्यक्ती, HUF, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विक्रीसाठी प्रतिबंधित असते.

कालावधी:

या योजनेचा कार्यकाळ आठ वर्षांसाठी असणार आहे.

व्याज दर:

गुंतवणूकदारांना प्रत्येक 6 महिन्यांनी नाममात्र किमतीवर वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज देण्यात येईल.

मर्यादा:

या खास योजनेत कमीत कमी गुंतवणूक एका ग्रॅम सोन्यात करता येते. तसेच कमाल गुंतवणूक मर्यादा वैयक्तिकांसाठी 4 किलो, एचयूएफसाठी 4 किलो आणि ट्रस्ट आणि संस्थांसाठी 20 किलो इतकी आहे.

विमोचन किंमत:

सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत विमोचन किंमत IBJA ने प्रकाशित करण्यात आलेल्या शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांतील 999 शुद्धतेच्या सोन्याच्या बंद किमतींच्या सरासरीवर असणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts