Special FD Offers : बँक ही आपल्या ग्राहकांना मालामाल करण्यासाठी नवनवीन योजना आणत असते. ग्राहकांना नेहमीच्या चांगल्या चांगल्या ऑफर्स दिल्या जातात. यात स्पेशल एफडी स्कीमचा देखील समावेश आहे. येथे ठराविक कालावधीसाठी गुंतवणुकीवर व्याज दिले जाते. तथापि, ही ऑफर काही ठराविक कालावधीसाठी बँकेकडून देण्यात असते.
आता इंडियन बँक आणि आयडीबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अशाच काही खास स्कीम आणल्या आहेत. मात्र, या स्कीमची अंतिम मुदत जवळ आली आहे. तुम्ही जर याचा फायदा घेतला तर तुम्हाला हाय इंटरेस्ट रेट मिळेल. चला जाणून घेऊयात –
इंडियन बँक स्पेशल एफडी
इंडियन बँकेने 400 दिवसांची स्पेशल FD योजना जाहीर केली आहे. यामध्ये गुंतवणूकदार 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करू शकतात. या मुदत ठेवीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के दराने तर 80 वर्षांवरील व्यक्तींना 8 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या महिन्याच्या अखेरीस याची मुदत संपणार आहे.
इंडियन बँक सुपर 300 एफडी स्कीम
इंडियन बँकेने 300 दिवसांसाठी खास प्लॅन जारी केला आहे. या अंतर्गत गुंतवणूकदार ग्राहकांना 5,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा करता येईल. यावर सर्वसामान्यांना 7.05 टक्के दराने व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.55 टक्के असणार आहे. सुपर सीनियरसाठी हा व्याजदर 7.8 टक्के आहे. ही स्कीम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
IDBI बँक स्पेशल एफडी स्कीम
आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडी स्कीमची मुदत 30 सप्टेंबरवरून 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत बँक 375 दिवस आणि 444 दिवसांचे दोन खास फिक्स्ड प्लॅन ऑफर करत आहे. बँक 375 दिवसांच्या एफडी वर सर्वसामान्यांना 7.1 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज देणार आहे. 444 दिवसांच्या मुदत ठेवीवर सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याज दर आहे.