आर्थिक

Special FD Scheme : येत्या 15 ऑगस्टला बंद होणार “या” योजना; गुंतवणूक करण्याची शेवटची संधी !

Special FD Scheme : ज्यांना आपल्या पैशांबाबत अथवा गुंतवणुकीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही अशा गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवी ही एक उत्तम योजना मानली जाते. तसेच हे गुंतवणुकीचे एक उत्कृष्ट साधन देखील मानले जाते. देशातील कोणत्याही बँक अथवा बँकेतर वित्तीय कंपनी इच्छुक गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवीचे खाते उघडण्याची सुविधा देतात.

दरम्यान, भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि आयडीबीआय बँकेची विशेष एफडी योजना लवकरच संपणार आहे. जे गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी लगेचच येथे गुंतवणूक करावी. बँका सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक दोघांनाही अधिक चांगल्या दराने व्याज देत आहेत. बँकेच्या या विशेष एफडीमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवून नक्कीच चांगला नफा मिळवू शकता.

SBI आणि IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, SBI ची अमृत कलश डिपॉझिट योजना, आणि IDBI ची अमृत महोत्सव FD योजना लवकरच संपत आहे, तर चला मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

SBI अमृत कलश योजना

SBI ची अतिशय खास अमृत कलश योजना 15 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे. ही योजना 400 दिवसांसाठी वैध आहे. या योजनेवर बँकेतील ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे, SBI च्या सामान्य ग्राहकांना 7.1 टक्के व्याज मिळेल.

SBI च्या सामान्य FD योजनांमध्ये, ग्राहकांना 3 ते 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.5 ते 7.5 टक्के व्याज 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाते.

IDBI अमृत महोत्सव योजना

IDBI बँकेने 375 दिवसांसाठी IDBI अमृत महोत्सव योजना नावाची विशेष FD योजना सुरू केली आहे. आयडीबीआय अमृत महोत्सव योजनेत सर्वसामान्य नागरिकांना 7.10  टक्के दराने व्याज दिले जाते. त्याचप्रमाणे, बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60 टक्के दराने व्याज दिले जाते. ही योजना देखील 15 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, ही विशेष FD योजना 375 आणि 444 दिवसांसाठी आहे, जी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वैध आहे. दुसरीकडे, IDBI बँक त्यांच्या सर्वसाधारण FD योजनेत 7 दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 3 ते 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.5 ते 7 टक्के व्याज देते.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts