SSY : समजा तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना उत्तम पर्याय ठरू शकतो. मुलींसाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. यात, मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रक्कम दिली जाते.
हे लक्षात घ्या की अल्पबचत योजनेतील ही सर्वात जास्त व्याज देणारी योजना आहे. या योजनेत तुमचे पैसे 3 पट वाढण्याची हमी मिळते. त्यामुळे तुम्हाला सहज आर्थिक अडचणींवर काही प्रमाणात मात करता येईल. जाणून घ्या या योजनेबद्दल.
समजा तुमच्या घरात दोन मुली जन्मल्या तर तुम्हाला एकरकमी रक्कम सहज मिळत असल्याने आता तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एक खाते उघडावे लागणार आहे. त्यानंतर गुंतवणूक प्रक्रिया सुरू होऊ शकते. जाणून घ्या वैशिष्ट्य.
जाणून घ्या योजनेचे वैशिष्ट्य
केंद्र सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना खूप फायदेशीर आहे. समजा तुमच्या घरी मुलगी जन्माला आली तर तुम्ही हे खाते उघडू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी हे खाते चालू करावे. त्यानंतर गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू होऊन तुम्हाला एकरकमी रक्कम सहज मिळेल.
तुम्हाला कमीत कमी 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. या योजनेची मुदतपूर्ती मर्यादा 21 वर्षे निश्चित केली आहे. या योजनेबाबत मुलींमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. आतापर्यंत देशभरात सुमारे 3 कोटी खाती चालू केली आहेत.
मिळतील लाखो रुपये
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीला एकरकमी रक्कम दिली जात आहे, ज्यामुळे तिचे स्वप्न पूर्ण होईल.या शानदार योजनेतील गुंतवणुकीवर ८ टक्के व्याज मिळत असून तुम्हाला यामध्ये मासिक 12,500 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
एका वर्षात, त्याला 1,50,000 लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. तर 15 वर्षात 22,50,000 रुपये गुंतवावे लागणार आहे. आता 8 टक्के बघितले तर 44,84,534 रुपये व्याज म्हणून देण्यात येतात. त्यानुसार तुम्हाला एकूण 67 लाख रुपये मिळतील.