SBI Loan:- सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून सोलर उपकरणे बसवण्याकरिता अनुदान देखील दिले जाते. अशाच पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच पीएम सूर्य घर योजनेची घोषणा करण्यात आलेली असून या माध्यमातून देशातील एक कोटींपेक्षा जास्त नागरिकांना घराच्या छतावर सोलर सिस्टम बसवण्याकरिता सबसिडी देण्यात येणार आहे.
घराच्या छतावर सोलर सिस्टम बसवलेल्या प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. घराच्या छतावर सोलर रूप-टॉप म्हणजे सोलर सिस्टीम बसवायचे असेल तर मात्र त्याकरिता लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. तुम्ही यामध्ये जितक्या अधिक किलोवॅटचे सोलर पॅनल बसवाल तितका जास्त खर्च वाढतो.
इतका खर्च प्रत्येक व्यक्तीला करणे शक्य नसते. त्यामुळे आता देशातील विविध बँका या योजनेसाठी कर्ज देत आहेत व यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया देखील मागे नसून या बँकेने देखील या योजनेकरिता नवीन कर्ज योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया लाखो रुपयांचे कर्ज सोलर सिस्टम बसवण्यासाठी देणार आहे. या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्ज योजनेविषयी आपण या लेखात माहिती घेऊ.
काय आहे एसबीआयची योजना आणि त्यासाठी अर्ज कसा करावा?
तुम्हाला देखील पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याकरिता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्ज मिळू शकते. याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही निकष लावण्यात आलेले आहेत.
जसे की सोलर रोपटॉप इन्स्टॉलेशन करिता कर्ज मिळवायचे असेल तर तुमचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये असणे गरजेचे आहे. यासोबतच 65 ते 75 वयोगटातील लोकांना देखील या माध्यमातून कर्ज मिळू शकते.
या माध्यमातून वार्षिक तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल अशा लोकांनी तीन किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवले तर त्यांना सात टक्के व्याजदराने दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे. तसेच तीन किलो वॅट ते दहा किलो वॅट सोलर रूट-टॉप करिता स्टेट बँकेच्या माध्यमातून सहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे व त्याचा व्याजदर 10.15% असू शकणार आहे.
सरकार किती देते अनुदान?
पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सरकार किलोवॅट क्षमतेनुसार अनुदान देत असून यामध्ये कमीत कमी 30 हजार रुपयांपासून तर जास्तीत जास्त 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान देय आहे.