Scheme For Women:- समाजातील आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल घटक तसेच बेरोजगार आणि महिला वर्गाकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहे व यातील बऱ्याच योजना अशा घटकांना व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून मदत करतात.
जेणेकरून अशा व्यवसायांच्या माध्यमातून हे घटक आत्मनिर्भर होतील व स्वतःच्या पायावर उभे राहतीलच व आर्थिक दृष्टिकोनातून देखील समृद्ध होतील हा यामागचा उद्देश आहे. या अनुषंगाने जर आपण महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने पाहिले तर महिला आर्थिक दृष्टिकोनातून आत्मनिर्भर व्हाव्यात
व समाजामध्ये त्यांचे असलेले स्थान उंचवावे याकरता देखील अनेक योजना असून या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी व इतर बाबींकरिता आर्थिक मदत केली जाते. अगदी याच अनुषंगाने जर आपण केंद्र सरकारच्या स्त्री शक्ती योजनेचा विचार केला तर ही एक सरकारी योजना असून ती महिला उद्योजकांना सवलती देऊन मोठ्या प्रमाणावर आधार द्यायचे काम करते.
कसे आहे स्त्री शक्ती पॅकेज योजनेचे स्वरूप?
ही योजना महिलांसाठी असून महिला उद्योजकांना या योजनेच्या माध्यमातून सवलती देऊन आर्थिक दृष्टिकोनातून आधार दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणी करणे गरजेचे असते व घेतलेल्या दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्जावर काही अंशी व्याजावर सवलत मिळत असते.
योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने सुरू केली आहे. देशातील महिला लाभार्थी होऊ शकतात. तसेच स्त्री शक्ती पॅकेज योजनेच्या माध्यमातून कमीत कमी दरामध्ये तुम्हाला कर्ज दिले जाते व या कर्जाची प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण होते.
तुम्हाला देखील जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेमध्ये जाऊन या संबंधीचा अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
स्त्री शक्ती योजनेअंतर्गत किती मिळते कर्ज?
केंद्र सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्त्री शक्ती पॅकेज योजनेच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त 25 लाख रुपये पर्यंत कर्ज या माध्यमातून मिळते. परंतु यामध्ये बँकेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निकष लावण्यात आला आहे व तो म्हणजे कर्ज घेणाऱ्या महिलेकडे संबंधित व्यवसायातील कमीत कमी 50 टक्के मालकी असणे गरजेचे आहे.
तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या महिलांसाठी व्याजदर हा 0.5% ने कमी केला जातो. तसेच ज्या उद्योगांची सूक्ष्म, लघु आणि मध्यम यामध्ये नोंदणी केलेली आहे अशा कंपन्यांकरिता कर्ज मर्यादा 50 हजार ते 25 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. या पॅकेज योजनेअंतर्गत पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी व्याज आकारले जाते. तुम्हाला जर पाच लाख रुपये कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी द्यायची गरज भासत नाही.