Success Story: अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हटले जाते. कारण जेव्हा पहिल्यांदा माणसाला अपयश येते तेव्हा त्या अपयशातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात व झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा ध्येयाच्या दिशेने भरारी घेऊन बरेच व्यक्ती यश संपादन करतात. परंतु अपयश येणे ही यशाची पहिली पायरी असते परंतु अपयश एक नाही दोन नाही तर तब्बल वीस वेळा येणे याला तुम्ही काय म्हणाल.
वीस वेळा एखाद्या व्यवसायांमध्ये अपयश येऊन देखील न हरता आलेल्या अडचणींवर यशस्वीपणे मात करत अब्जावधीची कंपनी उभी करणे आणि तेही भारतात नव्हे तर अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रात हे पाहिजे तितके सोपे नाही. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण अपूर्व मेहता या अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या भारत वंशीय उद्योगपतीची यशोगाथा पाहिली तर तुम्हाला पटेल.
अपूर्व मेहता यांची यशोगाथा
अपूर्व मेहता यांची ओळख करायची म्हटले म्हणजे ते एक भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योजक आहेत. अपूर्व यांचे वडील भारतातून लिबिया आणि त्या ठिकाणाहून कॅनडामध्ये कामानिमित्त स्थलांतरित झाले होते. 2010 मध्ये मेहता हे सेएटलमध्ये राहायला होते व तेव्हा ते ॲमेझॉन या ऑनलाइन सेलिंग प्लॅटफॉर्मच्या पुरवठा साखळीमध्ये अभियंता म्हणून करारात देखील होते. परंतु यामध्ये त्यांचे मन लागत नव्हते व स्वतःचा कुठलातरी व्यवसाय सुरू करावा ही मनोमन इच्छा त्यांची होती.
याच इच्छेला मृत स्वरूप देण्याकरिता त्यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि सॅनफ्रँसीकोला ते स्थायिक झाले. आज जर त्यांचा प्रवास पाहिला तर ते इन्स्टाकार्ट या कंपनीचे संस्थापक असून जी अमेरिकेतील सर्वात मोठी डिलिव्हरी कंपनी आहे. अपूर्व मेहता हे या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून अनेक वस्तू ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतात.
अपूर्व मेहता यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर वॉटरलू विद्यापीठातून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले व ॲमेझॉनच्या सप्लाय चेन लॉजिस्टिकमध्ये दोन वर्ष नोकरी केली. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला व एंटरप्राइज सॉफ्टवेअर पासून जाहिरात स्टार्टअप पर्यंत इत्यादी अनेक बिझनेस आयडिया वर त्यांनी काम केले परंतु यामध्ये अपयश येत गेले.
परंतु न डगमगता त्यांनी इन्स्टाकार्टची स्थापना केली व 2012 मध्ये सुरुवात करून या माध्यमातून ग्रोसरी अर्थात किराणामाल ग्राहकांना पुरवायला सुरुवात केली. 2012 मध्ये अपूर्व मेहता यांच्याकडे कार किंवा बाईक यापैकी काहीही नव्हते. आलेल्या ऑर्डर पूर्ण करण्याकरिता सामानाची डिलिव्हरी ते स्वतः करायचे. इन्स्टाकार्टची सेवा लोकांना आवडली व लोकांना त्याच्या सवय लागली व अकरा वर्षात ही कंपनी उत्तर अमेरिकेतील नागरिकांची पहिली पसंती ठरली.
परंतु हा प्रवास इतका सोपा नव्हता. या कंपनीच्या अगोदर अपूर्व मेहता यांनी अनेक स्टार्टअप उभे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पदरी निराशा आली. प्रत्येक अपयशा मधून त्यांनी चुकांचा शोध घेतला व त्या सुधारल्या व त्यातून बरेच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला.
2012 मध्ये त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले व या वर्षीच त्यांनी इन्स्टाकार्ट या कंपनीची सुरुवात केली. 2012 ते 2021 या कालावधीचा विचार केला तर अमेरिकेतील रिटेल क्षेत्रामध्ये सर्वात मोठी किराणा श्रेणी म्हणून इन्स्टाकार्ट नावारूपाला आली. आज या कंपनीचे बाजार मूल्य पाहिले तर 31 जून रोजी संपलेल्या सहामाहीमध्ये या कंपनीचा महसूल 31 टक्के वाढून $1.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाला आहे.
काय आहे या कंपनीचे काम?
इन्स्टाकार्ट हे एक ऑनलाईन डिलिव्हरी ॲप असून या एप्लीकेशनच्या माध्यमातून किराणामाल डिलिव्हरी आणि पिकअप सेवा उपलब्ध करून देण्यात येते. कंपनीचे मुख्य कार्यालय कॅलिफोर्नियाच्या सॅनफ्रँसीको या ठिकाणी असुन ही कंपनी वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लोकांना सेवा पुरवते. सध्या या कंपनीचा कामाचा आवाका पाहिला तर अमेरिकेतील 50 राज्यातील साडेपाच हजार शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने किराणा मालाची डिलिव्हरी पोहोचवण्याचे काम इन्स्टाकार्ट करते.