आर्थिक

Success Story: एकेकाळी मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा तर 100 कोटीची कंपनीचा मालक! वाचा प्रवीणच्या खडतर प्रवासाची कहाणी

Success Story:- कर्नाटकमध्ये सहा रुपये दररोज मजुरीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका मुलाने अवघ्या 1800 रुपयांच्या भांडवला पासून कंपनीची सुरुवात केली व अखंड मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर या कंपनीची किंमत शंभर कोटी रुपयांवर नेली व या कंपनीचे नाव आहे स्वदेशी ग्रुप होय.

या कंपनीचा यशाचा खरा शिल्पकार हा प्रवीण असून असंख्य अडथळ्यांना पार करत त्याने इथपर्यंत मजल मारली आहे. नेमके प्रवीणने या कंपनीला यशाच्या शिखरापर्यंत कशा पद्धतीने नेली? याबाबतची यशोगाथा आपण या लेखात पाहणार आहोत.

 अठराशे रुपये भांडवलात सुरू केली कंपनी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रवीणचा जन्म हा कर्नाटक राज्यातील दावणगिरी शहरातील देवरा होनाली गावांमध्ये झाला. प्रवीणचे कुटुंब हे शेतकरी कुटुंब होते व त्यामुळे कोणत्याही सुविधा त्याला मिळाल्या नाहीत. मुख्य म्हणजे देवरा होणाली गाव इतके दुर्गम आणि मागासलेले होते की त्या ठिकाणी नियमितपणे विज देखील नव्हती.एवढेच नाही तर आठवी वर्गानंतर त्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी शाळा देखील नव्हती.

परंतु प्रवीणाने गावापासून सात किलोमीटर दूर असलेल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतले व दररोज 14 किलोमीटर येऊन जाऊन पायी प्रवास करून शाळा सुरू ठेवली. मोठ्या कष्टाने त्याने दहावी पार केली व परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाला. विशेष म्हणजे प्रवीण हा त्याच्या गावातील पहिला दहावी उत्तीर्ण झालेला मुलगा होता.

परंतु घरची शेतकरी कुटुंब असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची होती व त्यामुळे त्याला देखील आई-वडिलांसोबत मजूर म्हणून काम करायला लागायचं. प्रवीणला त्याकाळी दररोज सहा रुपये मजुरी मिळायची. परंतु उज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असलेल्या प्रवीणने मात्र न थांबता  गाव सोडले व दावणगेरे शहर गाठले.

या शहरामध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व पार्ट टाइम नोकरी केली. घरच्यांना आर्थिक पाठिंबा देणे खूप गरजेचे होते. त्यामुळे ग्रॅज्युएशन केल्यानंतर कार्पोरेट करिअरची सुरुवात पारले कंपनीतून केली व कोको कोला तसे विप्रो व ओयो सारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये पंधरा वर्षे काम केले.

त्यामुळे विक्री विभागामध्ये काम करायचा अनुभव मिळाला व या क्षेत्रात प्राविण्य देखील त्याला मिळाले. ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या विचाराने तो प्रभावीत झाला व काहीतरी स्टार्टअप सुरू करावा अशी इच्छा मनाशी आली.

 नोकरी गेली आणि कंपनीची सुरुवात केली

मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जगात कोरोनाचे सावट पसरले आणि इतरांप्रमाणेच प्रवीणची देखील नोकरी गेली. त्यानंतर मात्र त्याने व्यवसाय करण्याच्या इच्छेने 2020 मध्ये कामाला सुरुवात केली आणि दोन वर्षे कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करून म्हैसूर या ठिकाणी स्वदेशी ग्रुप या नावाने अक्षय ऊर्जा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

हा व्यवसाय सुरू करताना कंपनीच्या नोंदणी करिता 1800 रुपये खर्च त्याला आला व नंतर त्यांनी कर्नाटकातील टीएर दोन आणि टीयर तीन शहरांमध्ये सोलर वाटर हीटर विकायला सुरुवात केली.

 पत्नीची साथ ठरली मोलाची

म्हणतात ना एखादा यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो अगदी त्याच मुद्द्याला धरून प्रवीणच्या पत्नी चिन्मयी यांनी देखील त्याला मोलाची साथ दिली व त्यांच्या मदतीने प्रवीणने कामाला सुरुवात केली. सुरुवातीला प्रवीण उधार सोलर वाटर हीटर ची खरेदी करायचा व त्यांची विक्री झाल्यानंतर संबंधित उत्पादकाला पैसे द्यायचा.

परंतु जेव्हा प्रवीण सोलर वाटर हीटर विकत होता.तेव्हा ग्राहकांनी त्याला इतर सोलर उपकरणे व वॉटर प्युरिफायर इत्यादी बद्दल देखील मागणी केली व त्याला व्यवसायाची कल्पना सुचली. यातून त्याने आपण आपली स्वतःची उत्पादने बनवून विकू शकतो हा विश्वास आला.

 या लोकांनी दिला आर्थिक पाठिंबा

नंतर त्याच्या निर्मात्याला त्यांनी व्यवस्थित कल्पना सांगितली व त्या व्यवसायिकाला यशाची हमी पटवून दिली. तिथून त्याला दहा लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळाले व त्याचा वापर करून प्रवीणने एक शोरूम सुरू केले व त्या ठिकाणी सौर उर्जेवर चालणारी सोलार वॉटर हिटर, सोलर इन्वर्टर,सोलर बॅटरी,

वॉटर प्युरिफायर तसेच स्वयंचलित वॉटर लेव्हल कंट्रोलर, इयर हिट कंपनी तर अनेक गोष्टी शोरूम मध्ये ठेवल्या. त्या माध्यमातून स्वदेशी समूहाला दोन वर्षांमध्ये चांगले यश मिळाले व पहिल्या वर्षी प्रवीणने स्वतःची पहिली फ्रॅंचाईजी सुरू केली.

आज संपूर्ण कर्नाटक राज्यात पंधरा शोरूम उघडले असून त्यातील चार हे स्वदेशी ग्रुपच्या मालकीचे आहेत व बाकीचे फ्रॅंचाईजी आहेत. ही कंपनी B2B आणि B2C दोन्ही तत्त्वावर काम करते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts