Sukanya Samriddhi Yojana: तुम्ही देखील मार्च 2023 पासून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा तिच्या शिक्षणासाठी गुंतणवूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज या लेखात केंद्र सरकारच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी लाखो रुपयांचा निधी अगदी कमी वेळेत जमा करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि मस्त योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना सर्वात बेस्ट ठरू शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही लहान बचत योजना आहे. या योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते उघडता येते. आम्ही तुम्हाला सांगतो सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते आणि सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते सुरू ठेवता येते. बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे.
SSY अंतर्गत खाते 10 वर्षापूर्वी मुलाच्या जन्मानंतर किमान 250 रुपये ठेवीसह उघडले जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षात SSY अंतर्गत, वर्षाला जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. सध्या त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या दोन्ही मुलींसाठी खाते उघडू शकता. वयाच्या 21 व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात.
या योजनेत 9 वर्षे आणि 4 महिन्यांत रक्कम दुप्पट होईल. परिपक्वतेवर 15 लाख रुपये मिळतील जर तुम्ही या योजनेत दरमहा रु. 3000 म्हणजेच दररोज 100 रुपयांची रोजची गुंतवणूक केली तर रुपये 36000 वर तुम्हाला 14 वर्षांनंतर 7.6% वार्षिक चक्रवाढीने रु. 9,11,574 मिळतील. ही रक्कम 21 वर्षांच्या म्हणजेच मॅच्युरिटीवर सुमारे 15,22,221 रुपये असेल. जर तुम्ही दररोज 416 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी 65 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.
हे पण वाचा :- SBI ने आणला भन्नाट प्लॅन ! आता काहीही न करता महिन्याला कमवता येणार 60 हजार रुपये ; असा घ्या लाभ