Sukanya Samriddhi Yojana : अनेकजण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये जबरदस्त परतावा दिला जातो. या योजनांमध्ये व्याज देखील चांगले मिळते.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच सुकन्या समृद्धी खाते उघडले तर तो या योजनेत 15 वर्षांसाठी पैसे जमा करू शकतो. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मॅच्युरिटी रकमेच्या 50% रक्कम काढली जाते. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर उरलेली रक्कम काढता येते.
जर तुम्ही ही योजना सुरु केली तर तुम्हाला या योजनेंतर्गत खाते चालू करून तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा ताण दूर करता येईल किंवा कमी करता येईल. सध्या यामध्ये गुंतवणुकीवर 8 टक्के दराने व्याज दिले जात आहे. एका आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त सुकन्या समृद्धी खाती उघडली आहे.
ही योजना 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेटमध्ये तुम्हाला वार्षिक 250 ते 1.50 लाख रुपये जमा करता येतात. या योजनेंतर्गत 10 वर्षांखालील मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावर उघडण्यात येते, मुलीच्या पालकांना केवळ सुरुवातीच्या 15 वर्षांसाठी पैसे जमा करावे लागत असून ते 21 वर्षात परिपक्व होते. हे लक्षात घ्या मुलीच्या पालकाला पुढील सहा वर्षांसाठी पैसे जमा करण्याची गरज पडत नाही.
या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षे असून यानंतर, या खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्यात येते. परंतु 18 वर्षांची झाल्यानंतर, सुकन्या खात्यातून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी 50% पैसे काढू शकतात.
जाणून घ्या योजनेचे गणित