Sungarner Energies : अवघ्या 83 रुपयांच्या IPO ने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी या कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग ₹ 237.50 झाले आहे. जर तुमच्याकडेही हा शेअर असेल तर तुम्हीही लाखो रुपयांची कमाई करू शकता.
नुकतीच पॉवर सोल्युशन्स कंपनी सनगार्नर एनर्जीजच्या आयपीओनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री केली आहे. या IPO ची इश्यू प्राईज 83 रुपये इतकी होती, तर दुसरीकडे या कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग ₹ 237.50 झाले आहे. तर त्याच वेळी, ट्रेडिंग दरम्यान कंपनीच्या या शेअरची किंमत 262 रुपयांपर्यंत पोहोचली होती.
कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना इश्यू किमतीच्या तुलनेत शेअरने 331% नफा दिला आहे. परंतु या दरम्यान प्रॉफिट बुकींगही दिसून आले आहे. शिवाय या शेअरला 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागले आहे. जाणून घेऊयात या कंपनीच्या शेअरबद्दल सविस्तर माहिती.
जाणून घ्या IPO चा तपशील
हे लक्षात घ्या की Sungarner Energies Limited ने पब्लिक इश्यूमध्ये 6.4 लाख शेअर्स ऑफर करून तब्बल 5.31 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. इतकेच नाही तर या IPO ला एकूण 152.40 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहेत.
त्यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांचे 193 पट सबस्क्रिप्शन होते आणि हा आयपीओ 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता. तर त्याचे प्रमुख व्यवस्थापक फास्ट ट्रॅक फिनसेक प्रायव्हेट लिमिटेड आणि रजिस्ट्रार स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे होते.
जाणून घ्या कंपनीबद्दल
Sungarner Energies Limited ही ऊर्जा क्षेत्रातील सौर ऊर्जा, UPS, बॅटरी, इन्व्हर्टर आणि सौर पॅनेलसाठी डिझाइन आणि अभियांत्रिकी सेवा प्रदान करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी WMI कोड प्राप्त झाला आहे. परंतु ते अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. मार्च 2023 ला आर्थिक वर्षात, या कंपनीने तब्बल 74.30 लाख रुपयांचा नफा आणि 1.68 कोटी रुपयांची कमाई केली होती.