आर्थिक

Superb Business Idea: कशाला शोधता नोकरी! ‘या’ व्यवसायात करा एकदा गुंतवणूक आणि आयुष्यभर कमवा लाखोत पैसा

Superb Business Idea:- बरेच व्यक्ती हे व्यवसाय करण्याचे ठरवतात. परंतु मनामध्ये जेव्हा व्यवसाय करायचे निश्चित होते तेव्हा मात्र कोणता व्यवसाय करावा? हा एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. कारण व्यवसायाची निवड करताना त्याच्यासाठी असलेली बाजारपेठ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक या गोष्टींचा विचार प्रामुख्याने केला जातो.

हे सगळे निश्चित झाल्यानंतर त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला मिळणारे आर्थिक उत्पन्न किती मिळेल? हा देखील एक मोठा प्रश्न असतो. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे ज्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. तो व्यवसाय करण्याची जवळपास निश्चित केले जाते.

व्यवसायाची यादी पाहिली तर ती छोटे मोठी व्यवसाय पकडून खूप मोठी यादी होते. परंतु या व्यवसायांमध्ये पाणी विकून पैसा कमावण्याचा व्यवसाय हा खूप फायदेशीर असा व्यवसाय आहे. कारण पाण्याच्या बाबतीत पाहिले तर शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे ही काळाची गरज असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ते महत्त्वाचे आहे.

त्यामुळे एकंदरीत भारतामध्ये पॅकेज ड्रिंकिंग वॉटर अर्थात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत असून आकडेवारी पाहिली तर प्रत्येक वर्षी 20 टक्के दराने हा व्यवसाय वाढत आहे.

मिनरल वॉटर किंवा आरओ व्यवसायामध्ये अनेक ब्रॅण्डेड कंपन्या उतरले असून यामध्ये एक रुपयाचे पाणी पाऊच पासून ते 20 रुपये पर्यंतची पाण्याची बाटली आपल्याला मिळते. त्यामुळे सदा सर्वकाळ या व्यवसायाला अच्छे दिन आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणपणे या गोष्टीची करावी लागते तयारी

या करता तुम्हाला अगोदर एका कंपनीची सुरुवात करावी लागेल व कंपनी कायद्याच्या माध्यमातून तिची नोंदणी करावी लागेल. त्या कंपनीचा पॅन आणि जीएसटी नंबर इत्यादी तुम्हाला घेणे गरजेचे राहील.

त्यानंतर तुम्हाला पाण्यासाठी बोरिंग, आरओ, चिलर मशीन आणि पाण्याचे जार किंवा इतर साहित्य ठेवण्यासाठी 1000 ते 1500 स्क्वेअर फुट जागांची आवश्यकता भासेल. तसेच पाण्याची साठवण करण्यासाठी टाक्या वगैरे लागतील.

 आरओ किंवा मिनरल प्लांटसाठी कर्ज सुविधा

कंपनी स्थापन करण्यासाठी जागा अशी निवडावी की ज्या ठिकाणी तुम्हाला पाण्यासाठी कमीत कमी टीडीएस द्यावा लागेल. त्यानंतर शासनाकडून तुम्हाला लायसन्स आणि आयएसआय क्रमांक घेणे गरजेचे राहील. भारतामध्ये अनेक कंपन्या आरो प्लांट इन्स्टॉल करतात व यामध्ये त्या 50 हजारापासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे प्लांट बनवतात.

तसेच वीस लिटर क्षमतेचे शंभर जार तरी तुम्हाला याकरिता लागतील. हे सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येईल. यामध्ये तुम्ही बँकेकडून कर्जासाठी अर्ज देखील करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही जर 1000 लिटर पाणी तयार करणारा प्लांट ची सुरुवात केली तर कमीत कमी 30 ते 50 हजार रुपये तुम्ही कमवू शकतात.

 या व्यवसायात किती मिळतो नफा?

या व्यवसायामध्ये अनेक जण उतरले असून पाण्याची गुणवत्ता आणि वितरण चांगले असेल तर तुमची कमाई या माध्यमातून खूप चांगली होऊ शकते. तुमच्याकडे 150 नियमित ग्राहक असतील आणि प्रत्येक दिवशी तुम्ही प्रत्येक व्यक्ती एक जार पाणीपुरवठा करत असाल आणि एका कंटेनर अर्थात जारची किंमत जर पंचवीस रुपये असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला एक लाख बारा हजार पाचशे रुपयांची कमाई करू शकतात.

यामध्ये विज बिल तसेच डिझेल, कर्मचाऱ्यांचा पगार व भाडे इत्यादी खर्च वजा जाता तुम्ही महिन्याला वीस ते पंचवीस हजारांचा नफा तुम्ही या माध्यमातून मिळवू शकतात. यामध्ये जसजसे तुमच्या ग्राहक वाढतील तसं तसा नफा देखील वाढत जाईल.

 डीलरशिप घेऊन सुरू करू शकतात हा व्यवसाय

या व्यवसाय मध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या असून उदाहरण घ्यायचे झाले तर एक्वाफिना, बिसलेरी तसेच किनले यासारखे ब्रँड्स 200 ml पासून ते एक लिटर पर्यंतच्या पाण्याच्या बाटल्या बनवतात व या बाटल्यांना प्रचंड मागणी आहे.

त्यासोबत वीस लिटरचे पाण्याचे जार देखील ते पुरवतात. अशा कंपनीकडून तुम्ही डिस्ट्रीब्यूटरशिप देखील घेऊ शकतात. याकरिता तुम्हाला पाच ते दहा लाख रुपये गुंतवावे लागतात. डीलरशिप घेऊन देखील तुम्ही अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts