आर्थिक

सरकारची मदत घेऊन सुरू कराल ‘हे’ व्यवसाय तर मिळेल लाखो रुपये कमावण्याची संधी! वाचा ए टू झेड माहिती

तरुण आणि शेतकऱ्यांनी आता व्यवसायाची उभारणी करून व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे व ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून  बघितले तर सध्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

तसेच तरुणांना देखील शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असल्यामुळे आता नोकऱ्यांच्या मागे न लागता एखादा व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे. या अनुषंगाने आता सरकारच्या माध्यमातून देखील विविध योजना राबवून अशा उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत करण्यात येते.

व्यवसायांच्या यादीमध्ये जर आपण शेती संबंधित व्यवसाय पाहिले तर यामध्ये तुम्ही डेअरी व्यवसायापासून तर अनेक शेतीमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी करू शकतात व अशा प्रकारच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सरकारच्या योजनांमधून अनुदान मिळते. म्हणून या लेखामध्ये आपण अशाच काही व्यवसायांची माहिती घेऊन जे शेती करत असताना देखील शेतकरी करू शकतात व तरुणांसाठी देखील आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत.

 हे व्यवसाय देतील आर्थिक समृद्धी

1- नाचणी बिस्किटे बनवणे आपल्याला माहित आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून भरड धान्य व तृणधान्य यांच्या उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून सरकारच्या योजना देखील यासाठी राबवल्या जात आहेत. आजकाल आरोग्याच्या समस्यांमुळे तृणधान्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आहारात महत्व आहे.

अशा प्रकारच्या तृणधान्यांपासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची मागणी आता दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. विशेष म्हणजे अशा उत्पादनांना स्थानिक पातळीवरच मार्केट उपलब्ध आहे. त्यामुळे अशा उद्योगांना सरकार अनुदान देत असल्यामुळे अशा अनुदानाचा फायदा घेऊन कमी खर्चात नाचणी किंवा मिलेट पासून बिस्किटे  बनवण्याचा व्यवसाय आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याचा सिद्ध होऊ शकतो.

यामध्ये जर तुम्ही नाचणी बिस्किटांचा व्यवसाय सुरू केला तर याकरिता तुम्हाला शुद्ध तूप, लोणी तसेच साखर अथवा गूळ, बेकिंग पावडर, व्हॅनिला पावडर आणि इतर पॅकिंग साहित्य आवश्यक असते व हा कच्चामाल वापरून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

2- लोणची बनवण्याचा व्यवसाय लोणचे हे भारतीय आहारामध्ये खूप महत्त्वाचे असून प्रत्येक घरामध्ये आपल्याला लोणचे जेवणासोबत आढळून येते. परंतु लोणचे बनवण्याचा व्यवसाय जर सुरू करायचा ठरवला तर तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये जास्त नफा या माध्यमातून मिळवू शकतात.

यामध्ये तुम्ही लिंबू, कैरी तसेच हळद व मिरची अशा पदार्थांपासून लोणची बनवण्याचा व्यवसाय करू शकतात. तुम्ही कैरीचेच लोणचे नाहीतर लिंबू, मिरची तसेच करवंद, आवळा व हळद तसेच फणस इत्यादी प्रकारचे लोणचे बनवून ते विक्री करून चांगला पैसा मिळवू शकतात.

3- पापड बनवण्याचा व्यवसाय ज्याप्रमाणे लोणच्याचा वापर आहारामध्ये केला जातो अगदी त्याचप्रमाणे आहारात मोठ्या प्रमाणावर पापड भारतात वापरला जातो. त्यामुळे पापड बनवण्याला व्यवसायाचे स्वरूप देऊन तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात. अनेक महिला अगदी घरातून हा व्यवसाय उभारू शकतात.

हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारकडून देखील सबसिडी मिळते. पापड उद्योगांमध्ये तुम्ही दहा, वीस किंवा 40 पापड पॅकेटमध्ये पॅकिंग करून त्याची विक्री करू शकतात. यामध्ये यंत्रसामग्री देखील विकसित करण्यात आलेली आहे. परंतु तरी देखील तुम्ही मॅन्युअल, सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक स्वरूपामध्ये पापड उद्योग सुरू करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts