Multibagger Stocks : गेल्या एका वर्षापासून टाटा कंपनीचे शेअर्स घसरत चालले आहेत. गुरुवारी देखील, त्यांचे शेअर्स 2.06 टक्के खाली, 6,973 रुपयांवर व्यवहार करत होते. यावेळी टाटाचे शेअर एका महिन्यात सुमारे 2 टक्क्यांनी घसरले आहेत, तर सहा महिन्यांत स्टॉक 20 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
याशिवाय टाटाचा हा शेअर एका वर्षात 7 टक्क्यांनी घसरला आहे. Tata Elexi शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 9,200 रुपये आहे आणि नीचांकी 6,411.20 रुपये प्रति शेअर आहे.
दरम्यान, Tata Elxsi ने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. Tata Elxsi ने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 184 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो 3 टक्क्यांनी घसरला आहे, तर कंपनीने एका वर्षापूर्वी याच कालावधीत 188 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. जून 2024 च्या तिमाहीत महसूल 9 टक्क्यांनी वाढून 926 कोटी रुपये झाला आहे, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 850 कोटी रुपये होता.
Tata Elxsi Limited चा EBITDA मागील वर्षीच्या याच तिमाहीत 233.7 कोटी वरून 3.6 टक्क्यांनी कमी होऊन 225 कोटी होता, तर EBIT मार्जिन 105 आधार अंकांनी घसरून 24.3 टक्क्यांवर आला. या तिमाहीत त्याचे निव्वळ मार्जिन किंवा करपूर्व नफा 26.3 टक्के होता.
निकाल जाहीर झाल्यानंतर Tata Elxsi चे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात 2.65 टक्क्यांनी घसरून 6,930.45 रुपयांवर आले आणि एकूण बाजार भांडवल 43,500 कोटी रुपयांवर पोहोचले. ही आतापर्यंतच्या उच्चांकावरून सुमारे 35 टक्के घट आहे. अशातच तज्ञानी हा शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे.