State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने नुकतीच मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने ही वाढ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या किरकोळ ठेवींवर आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवींवर केली आहे.
बँकेने 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवरील FD व्याजदरात 75 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता ते 4.75 टक्क्यांवरून 5.50 टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँकेने या कालावधीसाठी एफडीवरील व्याजदर 5.25 टक्के वरून सहा टक्के केला आहे.
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने 180 दिवसांवरून 210 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदरात 25 bps ने वाढ केली आहे. सर्वसामान्यांसाठी व्याजदर 5.75 टक्क्यांवरून सहा टक्के करण्यात आला आहे. 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर आता 6 टक्के ऐवजी 6.25 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ते 6.50 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आले आहे.
बँकेने सात ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी बल्क डिपॉझिटवरील व्याजदरात २५ टक्के वाढ केली आहे. आता ते पाच टक्क्यांऐवजी 5.25 टक्के करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.75 टक्के करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे 46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीसाठी 5.75 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के व्याज मिळेल. बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याज 6.25 टक्क्यांवरून 6.75 टक्के केले आहे. व्याजदर 180 दिवसांवरून 210 दिवसांपर्यंत 10 bps ने वाढवला आहे. सामान्य लोकांना 6.6 टक्के व्याज मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्के व्याज मिळेल.